संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
तुळजापूर — शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार श्रीकांत शिंदे,पालकमंत्री प्रतापजी सरनाईक,सचिव संजय मोरे,युवा सेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक,उपनेते तानाजी सावंत व ज्ञानराज चौगुले,सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते,तसेच मराठवाडा प्रमुख आकांक्षाताई चौगुले आणि किरण गायकवाड,युवा जिल्हा संपर्कप्रमुख नितीन लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवा सेनेची तुळजापूर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
या नव्या कार्यकारिणीत गणेश पाटील यांची तुळजापूर तालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली असून,सौरभ भोसले यांची तुळजापूर शहरप्रमुखपदी उपनेते ज्ञानराज चौगुले व युवा जिल्हाप्रमुख गणेश जगताप यांच्या हस्ते निवड करण्यात आली.नव्या नेतृत्वामुळे तालुक्यातील युवा सेनेला नवसंजीवनी मिळेल,असा विश्वास वरिष्ठांनी व्यक्त केला आहे.
या कार्यकारिणीच्या जाहीर कार्यक्रमास स्थानिक शिवसेना पदाधिकारी,युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि युवा सेनेचा विचार गावागावात पोहोचवू” असा निर्धार व्यक्त केला.
या निमित्ताने शिवसेना तुळजापूर तालुका प्रमुख अमोल जाधव यांनी सांगितले की,“युवा सेनेची ही नवी टीम गावागावात संघटन बळकट करेल,युवकांना संधी देईल आणि सरकारच्या जनकल्याणकारी योजना प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवेल.
तुळजापूर तालुक्यातील शिवसेना आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये या नव्या कार्यकारिणीच्या घोषणेनंतर आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख मोहन पनुरे,तालुकाप्रमुख अमोल जाधव,युवा सेना जिल्हा सरचिटणीस निखील घोडके,युवा सेना जिल्हा उपप्रमुख सुरज कोठावळे,शहर संघटक नितीन मस्के,उपशहरप्रमुख रमेश चिवचिवे,संजय लोंढे,शहाजी हक्के,स्वप्निल सुरवसे,अंकुश पाटील,निखील अमृतराव तसेच असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.









कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा