Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

शेळगाव येथे माजी आमदार व भाजपा नेते यशवंत माने यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या वाटप

 सहसंपादक --संदेश शहा

टाइम्स 45 न्यूज मराठी 

 मो:-9922 419 159


इंदापूर तालुक्यातील संत मुक्ताबाई मंदिर साठी प्रसिद्ध असलेल्या

शेळगाव चे सुपुत्र तसेच मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार यशवंत विठ्ठल माने यांच्या वाढदिवसानिमित्त शेळगाव परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व पेन चे वाटप करण्यात आले.

सोमवार दि.१० नोव्हेंबर रोजी शेळगाव येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेतील व तेल ओढा येथील प्राथमिक शाळेतील १८० विद्यार्थ्यांना यशवंत माने यांचे स्वीय सहाय्यक व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष संतोष बळीराम ननवरे यांच्या वतीने वह्या व पेन चे   वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षिका नीता यशवंत माने, शिक्षक उमेश सुपुते, परशुराम मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले

यावेळी माजी सरपंच रामदास शिंगाडे, कर्मयोगी शंकररखवजी


पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राहुल जाधव, हनुमान सोसायटीचे उपाध्यक्ष पोपट ननवरे, धनंजय ननवरे, प्रदीप कोथमिरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमजान सय्यद, राजेंद्र कोथमीरे, सदस्य भारत काळे, राहुल आठवले,मुख्याध्यापक सयाजीराव येवले,  अण्णासाहेब करळे, मुख्याध्यापक परशुराम मोहिते, अजिनाथ आदलिंग, मुकुंद ननवरे, पोपट ननवरे, पांडुरंग भोंग, अनिल अनारसे, भानुदास ननवरे, अंगणवाडी सेविका निता कोळपे, पूजा जाधव,सोनाली जाधव उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा