Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या इंदापूर शहराध्यक्ष रेश्मा शेख नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार..?

 संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448


इंदापूर : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून महानगरपालिका, नगरपरिषद चे निवडणुकीचे बिगुल वाजले असुन पक्षाची व  नेत्यांची व उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक मातब्बर निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे दिसत आहे. 

इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणूकीचे चित्र फार वेगळे पाहायला मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटींचे सत्र चालू असून नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 

इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मधून सर्वसाधारण स्त्री या जागेवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शहराध्यक्ष रेश्मा शेख या प्रबळ दावेदार इच्छुक आहेत. या प्रभागात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने व त्या स्वतः मुस्लिम असल्याने हमखास निवडून येण्याची खात्री असल्याचे सांगून त्या या जागेवर दावा सांगत आहेत. त्या शहरात गेले दहा वर्षापासून विविध सामाजिक कार्यात सहभागी असतात. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाने त्यांची महिला शहराध्यक्ष पदावर निवड केली आह. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सध्या त्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या महिला दक्षता कमीटीवर सदस्य पदी कार्यरत आहेत. त्यांचा शहरात असणारा दांडगा संपर्क व प्रभागात असणारी बहुसंख्य मुस्लिम मतदार यामुळे आपला विजय सहज शक्य असल्याचे त्या सांगत आहेत. त्यापुढे असेही म्हणाले की शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा