*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*
--- --- बारामती तालुका पोलिस ठाण्यात बारामती एमआयडीसी परिसरातील उद्योजकांची नुकतीच बैठक घेण्यात आली. सव्वा दोन तास झालेल्या या बैठकीत पोलिसांनी आणि एमआयडीसी प्रशासनाने औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करत त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
रिजनल ऑफिसर (एमआयडीसी) तथा उपजिल्हाधिकारी हनुमंत पाटील आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी बारामतीकरांच्या मूळ प्रश्नांना हात घातला आहे. त्यांनी फक्त कायदा-सुव्यवस्था नव्हे, तर औद्योगिक परिसरातील उद्योजकांच्या सुरक्षेचाही प्रश्न गांभीर्याने घेतला आहे. बैठकीस रिजनल ऑफिसर (एमआयडीसी) तथा उपजिल्हाधिकारी हनुमंत पाटील, असोसिएशनचे चेअरमन व सदस्य तसेच पोलिस अधिकारी उपस्थित होते.बैठकीत एमआयडीसी परिसरातील वाहतूक नियोजन, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, अवैध धंदे, रस्त्यावर होणारे पार्किंग आणि व्यवसायिकांना होणाऱ्या त्रासाबाबत आणि एमआयडीसी परिसरात काम करणाऱ्या महिला कामगार यांच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर चर्चा झाली. उद्योजकांकडून जबरदस्तीने पैसे किंवा कोणत्याही प्रकारची मागणी करणाऱ्यांविरुद्ध थेट खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील असा स्पष्ट इशारा यादव यांनी दिला. अलीकडेच एमआयडीसी परिसरात उद्योजकांना धमकावून मारहाण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना नगर येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच, वाद निर्माण करणाऱ्या परप्रांतीयांवरही कारवाई करण्यात आली असून, एकाच्या ताब्यातून तलवार जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय दोन हॉटेलमध्ये झालेल्या चोरीतील आरोपींना पकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
रिजनल ऑफिसर हनुमंत पाटील यांनी सांगितले की, 'एमआयडीसी परिसरात योग्य जागा उपलब्ध करून देऊन पार्किंगचा प्रश्न सोडवण्यात येईल. सीसीटीव्ही बसवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. तसेच उद्योजकांनीही आपल्या जबाबदाऱ्या वेळेवर पार पाडाव्यात.' बैठकीत परप्रांतीय मजुरांच्या नोंदी सर्व ठेकेदार आणि रूममालकांनी ठेवाव्यात, अशी सूचना करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच उद्योजकांकडून खंडणी मागणाऱ्या टोळीविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत आणि आरोपीच्या अटकेबाबतही चर्चा झाली
यावेळी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन चे धनंजय जामदार आणि सूर्यवंशी यांनी उद्योजकांना येणाऱ्या अडचणी संदर्भात सूचना मांडल्या. मीटिंग वेळी उद्योजक हरिश्चंद्र खाडे ग्रीन वर्ल्ड ॲग्रोटेक, मनोहर गावडे बारामती ऑक्सिजन, शिवाजी निंबाळकर, स्वागत उद्योग प्रा लिमिटेड, संदीप जगताप जे बी इंडस्ट्रीज नारायण हेगडे बालाजी इंडस्ट्रीज अमोल धायगुडे बारामती कॅटलेटेड अतुल काळे एशिया पॅक इंडस्ट्रीज गोळे एस ए अजित एजन्सी राकेश अवाक किर्लोस्कर फेरस अमित शर्मा Senvion कंपनी मुकेश चव्हाण schreibr dynamix योगेश मगदूम फेरेरो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड इमरान सलीम मोमीन भारत इंडस्ट्रीज A - 54, गणेश जडवे शंभू इंजीनियर सतीश कोकरे सतीश फॅब्रिकेटेड हरीश कुंभारकर समर्थ आयकॉन एन बी कोठमिरे गोपाल क्राफ्ट पॅक प्रायव्हेट लिमिटेड सौरभ मोहिते बेरी गलेबॉट चंद्रकांत भाटकर भाटकर टेलर भरत जाधव आरती एंटरप्राइजेस अशोक कुमार राव जय माता दी इंजिनिअरिंग अविनाश अर्जुन सावंत समर्थ इंटरप्राईजेस अरविंद कन्स्ट्रक्शन अँड ट्रान्सपोर्ट हे व इतर उद्योजक हजर होते.
______'___________________________________________
_







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा