*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
अकलूज नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना दीर्घकाळापासून संबंधित समस्यांबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ अरुण भोसले यांनी अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना हे निवेदन देऊन, मागण्या तातडीने न निकाली काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे अकलूज नगरपरिषद हद्दीतील प्रतापसिंह चौक ते ब्लड बँक या मुख्य रस्त्यावरील गटर ही ग्रामपंचायतीच्या काळातील जुनी असून पूर्णतः जीर्णावस्थेत आहे. नगरपरिषदेकडून जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून ती तशीच सोडल्याने गटारीचे पाणी रस्त्यावर साचून दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण झाली आहे सदर गटर नव्याने बांधावी अशी मागणी करण्यात आली तसेच स्वस्तिक लॉन्ड्रीलगत असणारा रस्ता अत्यंत खराब स्थितीत असून पावसाळ्यात पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा रस्ता सिमेंट काँक्रीट करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली
विकासकामांच्या दरम्यान प्रमुख रस्त्यांवर साचलेल्या चिखल व मातीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे हे रस्ते त्वरित स्वच्छ करावेत रस्त्यांच्या कडेला वाढलेली काटेरी झुडपे व गवत काढावे, कारण यामधून सर्प व विषारी प्राणी बाहेर पडण्याचा धोका आहे गटारींमध्ये साचलेला कचरा व गाळ काढून नियमित स्वच्छता करावी अस्ताव्यस्त पडलेला व एका ठिकाणी साठलेला कचरा उचलून परिसर स्वच्छ ठेवावा शहरातील अनेक ठिकाणी विद्युत दिवाबत्ती बंद अवस्थेत आहेत तर काही ठिकाणी नवीन खांब उभे असूनही दिवाबत्ती जोडण्यात आलेली नाही हे सर्व दिवे त्वरित सुरू करून नागरिकांना रात्री आवश्यक प्रकाश मिळावा अशी मागणी करण्यात आली तसेच प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरावेत, वाळलेली झाडे नव्याने लावावीत आणि त्यांची योग्य देखभाल करावी नगरपरिषद क्षेत्रात सुरू असलेली अनेक विकासकामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत वरिष्ठस्तरीय चौकशी समिती नेमावी व दोषींवर दंडात्मक कारवाई करून संबंधित ठेकेदार व कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे या सर्व मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने येत्या 17 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या बारामती येथील सहयोग सोसायटी समोर हलगीनादासह बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष सोमनाथ अरुण भोसले यांनी दिला आहे या प्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष विश्वास उगाडे, तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे, अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष स्वातीताई धाईंजे, युवक तालुका संघटक विकी लोंढे, तालुका सहसंपर्कप्रमुख बॉबी उगाडे, तालुका युवक प्रसिद्धीप्रमुख योगेश ढावरे, अकलूज शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे, अशोक कोळी, शहर खजिनदार इम्रान शेख, महिला आघाडी कार्याध्यक्ष पुष्पाताई भडंगे, महिला आघाडी खजिनदार सुवर्णाताई पांचाळ यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा