ज्येष्ठ पत्रकार --चंद्रकांत कुंभार
अकलूज
मौ:--9822 301115
आशिया खंडातील एक नंबरची ग्राम पंचायत म्हणून सर्वत्र ओळखल्या जाणाऱ्या अकलूज ग्रामपंचायत व माळेवाडी ग्राम पंचायतचे रूपांतर सलग ४३ दिवसाचे साखळी उपोषण करून एकत्रितपणे ३ ऑगस्ट २०२१ रोजी नगरपरिषदमध्ये झाले. २०११च्या जनगणनेनुसार अकलूजची लोकसंख्या ३९ हजार ९१९ होती. २०२५ मध्ये अंदाजे ४५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असू शकते. तर ४५ हजार १२४ मतदार आहेत. तेव्हापासून अद्याप नगरपरिषदेची निवडणूक झाली नाही. परंतु, नुकतीच प्रारूप रचना तयार करण्यात आली आहे. अकलूज नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे.
नगराध्यक्ष पदाच्या झालेल्या सोडतीम ध्ये अकलूज नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित आहे. गेली चार वर्षे नगरपरिषदेवर प्रशासक आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीविना नगरपरिषदेचा कारभार सुरू आहे. आता १३ प्रभागातून २६ नगरसेवक निवडले जाणार आहेत.
प्रभाग क्र. १ : लोकसंख्या ३६६६
प्रभाग गिरमेवस्ती, बोरावकेवस्ती, संत नरहरी नगर, आंबेडकर नगर, दत्त नगर, राऊतनगर, शिवकृपा कॉलनी, जयशंकर नगर, निरामईनगर, के. एल. गिरमे प्लॉट, भोरी वसाहत.
प्रभाग क्रमांक २: लोकसंख्या ३५५३, प्रभाग ठवरे प्लॉट, माने वस्ती पंचवटी, देशपांडे घाट, अकलाई मंदिर कमान, अकलाई नगर, स्म्शान भूमी, पंचशील नगर, शिवाजी चौक, रामायण चौक, गुरूनगर, होनमाने प्लॉट, ढोर गल्ली.
प्रभाग क्र. ३ : लोकसंख्या ३६४४, प्रभाग उद्यम नगर, रामबाग वसाहत, समतानगर रणजितनगर शाळा, जगताप वस्ती, पांढरे वस्ती, समतानगर, कर्मवीर
चौक, महादेव नगर, कृष्णप्रिया नगर, बाराभाई गट.
प्रभाग क्र. ४ः लोकसंख्या ३३६४ प्रभाग शनी मंदिर, देशमुख घाट, | देशपांडे घाट, शिवाजी चौक, रामायण चौक, रमामाता चौक, कुर्दुवाडी-म ाळशिरस रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, काझी गल्ली.
प्रभाग क्र. ५ः लोकसंख्या ३६६२ प्रभाग नामदेव मंगल कार्यालय, आव्हाड बोळ, लोणार गल्ली, शिवापूर पेठ, नगर परिषद कार्यालय, काझी गल्ली, शनी मंदिर घाट.
प्रभाग क्र. ६: लोकसंख्या ३१९८-प्रभाग विजय चौक, जयशंकर उद्यान, नौशाद बोळ, ईदगाह मैदान, कॅप्टन शेती, जोशी गल्ली, वडर गल्ली, लोणार गल्ली, खडके प्रेस.
प्रभाग क्र. ७ : लोकसंख्या ३५५१ प्रभाग सोनाज पंप, गांधी चौक, पवार वस्ती, नायर झोपडपट्टी, स्वीमिंग टैंक, नागोबा कट्टा, विकास नगर.
प्रभाग क्र. ८ः लोकसंख्या ३१४६ प्रभाग जयसिंह चौक, गांधी चौक, म हावीर स्तंभ, सभाऊ चौक, महर्षी चौक, लक्ष्मी नारायण नगर, गिरझनी चौक.
प्रभाग क्र. ९: लोकसंख्या ३७५८-प्रभाग गांधी चौक, जुने बस स्थानक, डॉ. आंबेडकर चौक, महर्षी कॉलनी, इंदिरानगर, बॅकवर्ड हौसिंग सोसायटी, उपजिल्हा रुग्णालय.
प्रभाग क्र. १० : लोकसंख्या ३२७८-प्रभाग अमरदीप हॉटेल, सद्भाऊ चौक, राजइंदिरा कॉम्प्लेक्स, गणेशनगर कमान, व्यकट नगर, डॉ. आंबेडकर चौक.
प्रभाग क्र. ११ : लोकसंख्या ३५२१
- प्रभाग - शिवरत्न मोटर्स, सद्भाऊ चौक, महर्षी चौक, प्रतापसिंह चौक, गणेशनगर.
प्रभाग क्र. १२: लोकसंख्या ३६४३
प्रभाग सुजयनगर सर्व भाग, पोलीस कॉलनी, क्रीडा संकुल, फुले नगर, स्टार इमॅजिन सेंटर, सह्याद्री आय टी आय, शिवाजीनगर, पटेल टिम्बर, शंकरराव मोहिते महाविद्यालय, साई पार्क, सावता माळी मंदिर, गिरमे हॉटेल, भारत फुले वस्ती, नगर परिषद विभागीय कार्यालय, सयाजीराजे नगर निम्मा भाग.
प्रभाग क्र. १३ः लोकसंख्या ३१४०-प्रभाग शांतीनगर, बनकर वस्ती, दत्तनगर, केंगार प्लॉट, विद्यानगर, अहिल्यानगर, अर्जुननगर, संजयनगर, बोडकेवस्ती, मोरेवस्ती, तोरसकरवस्ती, मुलाणीवस्ती.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा