Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

ओंकार साखर कारखान्याच्या २५००५ साखर पोत्याचे प्रशांतराव बोत्रेपाटील यांच्या हस्ते पूजन

 निमगाव ( म). प्रतिनिधी 

  रामचंद्र मगर 

टाइम्स 45 न्यूज मराठी



ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांच्या हस्ते पहिल्या २५००५ साखर पोत्यांचे पुजन करण्यात आले या वेळी बोलताना बोञे पाटील म्हणाले की ओंकार परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनखाली व 202६ या गळीत हंगामात आधिकारी व कर्मचारीवर्ग यांनी नियोजन केल्याने सुरूवातीपासून नवीन व जुना कारखाना पुर्ण क्षमतेने चालु असुन उप पदार्थ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत त्यामुळे या परिसरातील संपुर्ण ऊसाचे नियोजन बध्द गाळप केले जाईल तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला परिपक्व ऊस ओंकार साखर कारखान्याला घालावा असे आवाहन बोञे पाटील यांनी केले

या वेळी जनलमॅनेजर भिमराव वाघमोडे चीफ इंजीनियर तानाजीराव देवकते प्रोसेसिंग मॅनेजर समाधान गायकवाड इलेक्ट्रिक विभाग प्रमुख धनाजीराव पवार मेजर मोहन घोङके केन मॅनेजर शरद देवकर  एच् आर मॅनेजर निलेश गुरव ओ एस् रमेश औताङे ऊस उत्पादक शेतकरी रामभाऊ मगर नितीन जाधव विभाग प्रमुख बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा