Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०२५

निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या या हंगामातील पहिल्या इथेनॉल टँकरचे पूजन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व कारखान्याचे अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते संपन्न

 सहसंपादक-- डॉ. संदेश शहा

टाइम्स 45 न्यूज मराठी 

मो:-९९२२ ४१९ १५९




निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या चालु गळीत हंगामातील इथेनॉलचा पहिला टँकर ऑइल कंपन्यांच्या डेपोकडे मंगळवारी 

दि. ४ नोव्हेंबर रोजी रवाना करण्यात आला. यावेळी पहिल्या टँकरचे पूजन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील व कारखान्याच्या अध्यक्षा सौ. भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते शहाजीनगर ( ता. इंदापूर ) येथे संपन्न झाले. 

निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे चालू ऊस गळीत हंगामामध्ये इथेनॉल उत्पादनाचे सुमारे १ कोटी ३० लाख लिटरचे उद्दिष्ट असल्याची माहिती याप्रसंगी कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.  कारखान्याचा चालु गळीत हंगाम उत्कृष्टपणे सुरु असून दररोज सुमारे ५५०० मे. टन उसाचे गाळप केले जात आहे. 

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, ॲड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

                   ऍडव्हर्टाईस 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा