Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३० नोव्हेंबर, २०२५

मत म्हणजे शस्त्र ते विकाल तर चुकाल

 उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी


भ्रष्ट राजकारणामुळे आज लोकशाहीचा श्वास गुदमरत आहे,राजकारण इतके भ्रष्ट झाले आहे की हाच मार्ग समाजाचा विकास रोखण्यासाठी वापरला जातोय की काय अशी शंका वाटते.खरे तर आपणच म्हणजे मतदारच आपले मत विकून भ्रष्टाचाराला खतपाणी देतो आणि पुन्हा म्हणतो भ्रष्टाचार वाढला .हा भ्रष्टाचार रोखणे जनतेच्या हातात आहे ,पैसे घेवून मत देणे हा भ्रष्टाचार नाही का ? प्रत्येकाने  स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे.

निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव. पण आज परिस्थिती पाहिली तर हा उत्सव नव्हे, तर बाजारपेठ वाटते. पैशांचे बंडल, दारूच्या बाटल्या,मटण पार्ट्या     गिफ्टचे पॅकेट ,काशी अजमेर सारख्या दूरच्या देवस्थानांना बस किंवा विमानाने फुकट देवदर्शन आणि खोट्या आश्वासनांचा मुसळधार पाऊस… पाहून प्रश्न पडतो की लोकशाही विकली जातेय का? पैसे घेवून मत देणे म्हणजे स्वतःच आपल्या हाताने आपल्या आणि समाजाच्या अधिकारांचा गळा घोटने.

हिंदी भाषेत एक मुहवरा आहे " अपनी कब्र खुद खोदना " स्वतःचे भविष्य अंधकारमय करणे.

नोट घेतल्यावर मतदाराचा आवाज कायमचा मूक होतो.निवडणुकीदरम्यान मतदारांच्या दारात येणारी नोट म्हणजे मदत नव्हे; ती खरेदीची पावती असते.

ज्या क्षणी मतदार ती नोट स्वीकारतो, त्या क्षणी तो आपला स्वाभिमान, आपली हक्काची मागणी आणि पुढील पाच वर्षांचा भविष्य स्वतः विकून टाकतो.नेत्यांनी नोटा वाटणे  हा गुन्हा आहे पण त्या नोटा घेणारा मतदारही तेवढाच गुन्हेगार कारण भ्रष्टाचाराचा पहिला व्यवहार मतदाराच्या हातूनच सुरू होतो.ज्याला तुम्ही विकत घेतात, तोच तुमचे भविष्य विकतो ज्या नेत्याला तुम्ही पैशांच्या मोबदल्यात मत देता,तो नेता सत्तेत गेल्यावर त्याची पहिली प्राधान्यक्रम असते “मी खर्च केलेला पैसा परत कसा मिळवू?”त्या पैशाची वसुली कोणाकडून होते?

नक्कीच… जनतेकडून!

 निकृष्ट दर्जाचे रस्ते,अनुदानातली कपात

,योजनांची कागदोपत्री फसवणूक ही सर्व किंमत त्या एका नोटेची असते, जी निवडणुकीच्या काळात मतदाराने स्वतःच्या हातात घेतली होती.काही मतदार दारूच्या बाटलीसाठी आपले मतदान विकतात.

दारू संपते एका रात्रीत,

पण तिच्या बदल्यात मिळालेला नेता पाच वर्ष तुमच्या आयुष्यावर परिणाम करतो.

नोटा वाटणारे नेते धोरणे दाखवतात, पण उद्दिष्ट एकच असते वाटलेल धन पुन्हा गोळा करायचे.

मतांसाठी नव्हे, मूल्यांसाठी उभे रहा लोकशाहीचा पाया मतदारावर आहे.

मतदारच जागा झाला नाही, तर राजकारण कधीही बदलणार नाही.

मतदानाचा दिवस हा धर्म, जात, पैसा, किंवा स्वार्थाचा नाही तो विवेकाचा स्वाभिमानाचा दिवस आहे.

त्या दिवशी तुमच्या हातात पैसे ठेवले जातात, कारण नेत्यांना खात्री असते की तुम्ही विकले जाल.

ते चुकीचे सिद्ध करा. 

 लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वात आधी मतदाराने स्वतःला मजबूत करणे आवश्यक आहे.

स्वाभिमानाने मतदान करा.

नोट परत करा.जागरूक मतदार कधी विकला जात नाही हे नेत्यांना माहित असते

नेत्यांना दाखवा प्रत्येक मत मौल्यवान शस्त्र आहे ते  विकत मिळनार  नाही.लोकशाहीचा बाजार मांडला जाणार नाही

जनता जागी होते तेव्हा भ्रष्ट सत्ता अवश्य कोसळते.



नूरजहाँ फकरुद्दिन शेख

गणेशगाव ता.माळशिरस

९१४६४४३२८२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा