Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

गणेशवाडी ग्रामस्थांकडून देहुकर दिंडीच्या वारकऱ्यांना आमटी-भाकरीचा प्रसाद

*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी.                                मोबाईल नंबर 837808114


----- आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन सोहळ्यासाठी पंढरपूरहून निघालेल्या देहूकर दिंडीचा गुरूवारी (ता. ६) गणेशवाडी (ता. इंदापूर) येथे मुक्काम होता. दिंडीतील वारकऱ्यांना ग्रामस्थांच्या वतीने परंपरेप्रमाणे आमटी-भाकरी प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी बापूसाहेब मोरे महाराजांचे कीर्तन झाले. त्यास पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

      कार्तिकीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन करून आळंदीकडे संजीवन सोहळ्यासाठी दिंड्यांचे प्रस्थान होते. त्यात तुकाराम महाराजांचे वंशज सोपानकाका देहूकर महाराज यांची दिंडी अनेक वर्षांची परंपरा जपत गणेशवाडी येथे मुक्कामी असते. त्यानिमित्त ग्रामस्थांच्या वर्गणीतून ज्वारी, बाजरीची भाकरी तसेच तूरडाळीची आमटी बनवण्यात येते. दिंडीतील वारकरी आणि ग्रामस्थांनाही प्रसादाचे वाटप करण्यात येते. दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रामस्थांच्या वतीने दिंडीला भावपूर्वक निरोप देण्यात आला. दरम्यान सायंकाळी दिंडीचे गाववेशीवर आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले.

     शिंदेवस्ती येथे दिंडीतील वारकऱ्यांची चहा व नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. तसेच गणेशवाडी ग्रामस्थांच्या वर्गणीतून ज्वारी, बाजरीची भाकरी तसेच तूरडाळीची आमटी बनवण्यात येते. दिंडीतील वारकरी आणि ग्रामस्थांनाही त्या प्रसादाचे वाटप करण्यात येते. 

    परंपरा कायम टिकवून ठेवली :-

  ग्रामस्थांच्या वतीने वर्गणीपोटी मिळालेली ज्वारी व बाजरी दळून आणलेले पीठ गावातील प्रत्येक घरातील महिलांकडे पोहच केले जाते. त्याच्या भाकरी करून मंदिरात आणून देण्याची परंपरा अजूनही कायम आहे. तर आमटी मंदिरा लगतच बनवण्यात येते. सायंकाळी वारकऱ्यांच्या जेवणानंतर ग्रामस्थांना त्याचे वाटप करण्यात येते.

फोटो - गणेशवाडी येथे आमटी-भाकरीचा प्रसाद बनवताना ग्रामस्थ.

------------------------------------------------------------------------





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा