*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी**
*मो:-- 9730 867 448*
प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुळज येथे डिसेंबर 2018 मध्ये प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाची स्थापना करण्यात आली. या वाचनाला 7 वर्ष पूर्ण झाली असून आज रोजी या वाचनालयाच्या उमरगा-लोहारा तालुक्यातील ग्रामीण भागात इतर 13 शाखा कार्यान्वित आहेत. तसेच वाचनालयाच्या वतीने एक वाचन टपरी व दोन वाचन कट्टे चालवण्यात येतात. वाचनालयाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबण्यासह उमरगा-लोहारा तालुक्यातील सामाजिक, उद्योग, शिक्षण, शेती, साहित्य, पत्रकारिता, कला, क्रीडा, सहकार आणि वाचन चळवळ या क्षेत्रात विशेष काम करून बहुमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन दरवर्षी गौरव करण्यात येतो.
वाचनालयाच्या सातव्या वर्षपूर्तीनिमित्त यंदाही हा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार दिनांक 25 डिसेंबर, 2025 रोजी उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व नागरिकांनी या सोहळ्यास मित्रपरिवार व कुटुंबियासह उपस्थित रहावे अशी विनंती गौरव पुरस्कार सोहळ्याचे संकल्पक ऍड. शीतल चव्हाण यांच्याकडून व गौरव पुरस्कार सोहळा समितीकडून करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पुणे येथील प्रसिद्ध लेखक, अर्थतज्ञ व डाव्या-पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते मा. कॉम्रेड अजित अभ्यंकर हे उपस्थित राहणार आहेत. "वाचन संस्कृती, संविधान आणि आपण" या विषयावर ते उपस्थिताना संबोधित करणार आहेत. या सोहळ्याचे दीपप्रज्वलन उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. प्रवीण स्वामी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सोहळ्यास दरवर्षीप्रमाणे सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे.
यावर्षी या पुरस्काराचे मानकरी मा. डॉ. दामोदर पतंगे (जीवन गौरव), मा. वसंतराव नागदे (सहकाररत्न), मा. डॉ. दीपक पोफळे (समाजरत्न), मा. अनिल जगताप (कृषिरत्न), मा. बालाजी बिराजदार (पत्रकाररत्न), मा. रामजी साळुंखे (शिक्षकरत्न), मा. भाग्यश्री औरादे (ग्रंथ सेवा), मा. सतीश पवार (उद्योगरत्न), मा. विशाल काणेकर (कलारत्न), मा. महादेव शिंदे (उत्कृष्ट वाचक), मा. गौरी कांबळे (संगीत रत्न) हे आहेत.
गुणी रत्नांचा गौरव करण्याऱ्या या अखंडीत व गौरवशाली परंपरेचे नागरिकांतून कौतुक होत असून यात सर्वांनी सामील व्हावे असे आवाहन ऍड. शीतल चव्हाण यांनी केले आहे.
*****जाहिरात******👇






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा