Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

*शेलगाव (वां) येथे ‘केळी संशोधन केंद्र’ स्थापनेसाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची नवी दिल्लीमध्ये कृषि मंत्र्यांकडे मागणी

 *उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्यूज मराठी 



सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेलगाव (वां) येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) अंतर्गत ‘केळी संशोधन केंद्र’ स्थापन करण्याची मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज नवी दिल्लीमध्ये केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन केली.

             महाराष्ट्र राज्याचा देशातील एकूण केळी उत्पादनात 14.26% इतका महत्त्वपूर्ण वाटा आहे तसेच भारतातून होणाऱ्या एकूण केळी निर्यातीपैकी सुमारे 63% निर्यात केवळ महाराष्ट्रातून केली जाते. विशेषत: सोलापूर जिल्हा निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी देशभर प्रसिद्ध असून, मागील वर्षी महाराष्ट्रातून झालेल्या 12,43,899 मेट्रिक टन केळी निर्यातीपैकी सुमारे 8,26,322 मेट्रिक टन निर्यात सोलापूर जिल्ह्यातून झाली आहे. म्हणजेच राज्याच्या केळी निर्यातीतील सोलापूर जिल्ह्याचा वाटा 66.43% इतका आहे. ही बाब ठळकपणे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कृषिमंत्री शिवराज चव्हाण यांच्यासमोर मांडली.





                 शेलगाव (वां) येथे सुमारे 100 एकर शासकीय जमीन उपलब्ध असून, विद्यमान राज्य फळ नर्सरी तसेच शुष्क क्षेत्र संशोधन केंद्राच्या पायाभूत सुविधांमुळे केळी संशोधन केंद्रासाठी हे ठिकाण सर्वात योग्य असल्याचे विशेष अधोरेखित करण्यात आले. सध्याच्या हंगामात जिल्ह्यात सुमारे 32,000 हेक्टर क्षेत्रात केळीची लागवड झाल्याची माहितीही खासदारांनी कृषीमंत्र्यांना दिली.शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्राने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी भूमिका खासदार मोहिते पाटील यांनी कृषिमंत्र्यांसमोर मांडली.

         केळी उत्पादनात जागतिक स्तरावर स्पर्धात्मक क्षमतेसाठी वैज्ञानिक संशोधन,नवीन वाणांची निर्मिती,कीड-रोग व्यवस्थापन, प्रशिक्षण सुविधा अत्यावश्यक असल्याने करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथे केळी संशोधन केंद्र उभे करावे.ही मागणी केली.‌केंद्रीय कृषिमंत्र्यांनी ही मागणी तात्काळ विचारात घेऊन पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा