*उपसंपादक - नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
खासदार युवा उद्योजक विकास कार्यक्रम” अंतर्गत गुजरात अभ्यास दौऱ्यासाठी निवड प्रक्रिया संपन्न.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित “खासदार युवा उद्योजक विकास कार्यक्रम” अंतर्गत गांधीनगर, गुजरात येथे 15 ते 18 डिसेंबर 2025 दरम्यान अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या दौऱ्यासाठी उद्योजक तरुणांची निवड करण्याकरिता उद्घाटन व निवड प्रक्रिया कार्यक्रम 11 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता, शिवरत्न नॉलेज सिटी, शंकरनगर येथे संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन कु.इशिता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना कु.इशिता मोहिते-पाटील म्हणाल्या की,युवा उद्योजकांना योग्य संधी मिळाल्यास ते समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात.या अभ्यास दौऱ्याच्या संधीचा फायदा घ्यावा असे मनोगतातून त्यांनी व्यक्त केले.यावेळी तरुण उद्योजकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. उद्घाटनानंतर इच्छुक उमेदवारांची लेखी परीक्षा तसेच मुलाखत प्रक्रिया पार पडली.
या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून सहभागी तरुणांना उद्योग-व्यवस्थापन,नवकल्पना, सहकार क्षेत्रातील यशस्वी मॉडेल्स, तसेच स्टार्टअप इकोसिस्टम यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील आणि परिसरातील तरुण उद्योजकांना नव्या प्रेरणा आणि प्रगतीचा मार्ग खुला होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी शिवामृत दूध उत्पादक संघाचे व्हाइस चेअरमन दत्तात्रय भिलारे,शिवरत्न शिक्षण संस्थेचे सचिव धर्मराज दगडे, हरिश्चंद्र मगर,डॉ. विश्वनाथ आवड, नितीन बनकर,अनिल जाधव, श्रीकांत राऊत,वनिता कोरटकर, रवीराज इनामदार,अश्रफ शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा