मुख्य संपादक ---टाइम्स 45 न्युज मराठी
मो:--9730 867 448
खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त “सिंधूसे सिंदूर तक” या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन दि. 7 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येणार आहे. हिंदी विभाग, राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना दृढ करण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या पुढाकारातून हे आयोजन अधिक व्यापक झाले असून या चर्चासत्रात संरक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा, सीमा व्यवस्थापन आणि सशस्त्र दलांचे योगदान यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. विद्यार्थ्यांना संरक्षण विभागाशी संबंधित प्रत्यक्ष अनुभव घेण्याची ही खास संधी उपलब्ध झाली आहे.
या चर्चासत्राच्या अनुषंगाने 5 ते 7 डिसेंबर दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत खडकी अम्म्युनिशन फॅक्टरी आणि टी. जे. महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने भव्य संरक्षण शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे मॉडेल्स, दारूगोळा आणि तांत्रिक उपकरणांची माहिती पाहण्यासाठी खडकी व पुणे परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आव्हान खडकी संस्थेचे अध्यक्ष व कोहिनूर ग्रुपचे सर्वेसर्वा श्री. कृष्णकुमार गोयल यांनी केले आहे.
चर्चासत्र आणि शस्त्र प्रदर्शनाच्या यशस्वी नियोजनात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, पुणे पुस्तक महोत्सव आणि समर्थ युवा फाउंडेशनचे प्रमुख डॉ. राजेश पांडे, जेष्ठ शास्त्र डॉ. काशिनाथ देवधर आहेत.कार्यक्रम समन्वयक डॉ. अविनाश कोल्हे यांची भूमिका महत्वपूर्ण असणार आहे. “सिंधूसे सिंदूर तक” हे राष्ट्रीय चर्चासत्र आणि संरक्षण शस्त्र प्रदर्शन हे राष्ट्रीय सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणारा दुहेरी उपक्रम असून महाविद्यालयात देशभक्तीचे वातावरण वृद्धिंगत करत आहे. विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य संचारण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल,” असे मत श्री. गोयल यांनी या निमित्ताने व्यक्त केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा