Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २ डिसेंबर, २०२५

ज्येष्ठ पत्रकार शरद विश्वंभर लोहकरे यांचे अल्पशा आजाराने निधन.. सोलापूर जिल्ह्यातील अनेक दैनिकांचा अग्रदूत हरपला! माळशिरस तालुक्यातील प्रत्येक कार्यक्रमाचे दैनिक वृत्तपत्रात रंगीत छायाचित्र प्रसिद्ध करण्याची सुरुवात त्यांनी केली

 संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448



ज्या काळात व्हाट्सअप ई-मेल व डिजीटल कॅमेराची सुविधा नव्हती त्या काळात अकलूज परिसराबरोबरच माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडीचे वृत्तांकन करून संबंधित घडामोडींची छायाचित्रे आपल्या कॅमेरात टिपून ती जिल्ह्यातील प्रत्येक दैनिकांच्या ऑफिसला एसटीने रातोरात प्रवास फोटो व बातमी पोहोचवणारा अनेक दैनिकांचा अग्रदूत आज अल्पशा आजाराने कालाच्या ओघात कालकथीत झाला.

अकलूज मधील प्रसिद्ध छायाचित्रकार प्रेस फोटोग्राफर व ज्येष्ठ पत्रकार यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रत्येक राजकीय घडामोडींचे, आनंदयात्री जयसिंह मोहिते-पाटील यांच्या अकलूज परिसरातील सुवर्ण काळातील कारकिर्द तसेच लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा राजकीय प्रवासाचा इत्यभूत वृत्तांत सोलापूरच्या विविध दैनिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करणारे माळशिरस तालुक्यातील जेष्ठ पत्रकार शरद (अण्णा) लोहकरे यांचे निधनाने अकलूज व परिसरावर

शोककळा पसरली आहे. अकलूजमधील वृत्तपत्र क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेले शरद (अण्णा) लोहकरे यांचे घराणे त्यांच्या पश्चात त्यांचे दोन्ही पुत्र संजय लोहकरे व राजीव लोहकरे हे आजही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वृत्तपत्र क्षेत्रात काम करीत आहेत. दैनिक लोकमत सारख्या महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध दैनिकात राजीव लोकरे आपल्या प्रेस फोटोग्राफीच्या माध्यमातून त्याचबरोबर परखड व सडेतोड वृत्तांकनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला प्रसिद्ध आहेत तर संजय लोहकरे यांनी दैनिक जनमत वृत्तपत्रात बातमीदारी बरोबरच एक नावाजलेले प्रेस फोटोग्राफर आहे. स्वर्गीय शरद (अण्णा) लोहकरे यांची तिसरी पिढी केदार संजय लोहकरे यांच्या रूपाने आजही वृत्तपत्र क्षेत्रात आपला धबधबा निर्माण करत आहे. अशा शरद (अण्णा) लोहकरे यांच्या निधनाने सोलापूर जिल्ह्यातील नामांकित दैनिकाबरोबरच छोट्या-मोठ्या साप्ताहिक व दैनिकांचा अग्रदूत हरपला अशी भावना पत्रकार क्षेत्रातून व्यक्त होत आहे

माळशिरस तालुक्याच्या अकलूज

मधून त्या काळात नव्याने सुरू झालेले साप्ताहिक

वृत्तपत्र क्षेत्रात स्वतःबरोबरच संपूर्ण कुटुंबाला झोकुन द्यायला भाग पडणारा असा हा अवलीया पत्रकार स्वतःबरोबरच पत्रकारिता क्षेत्रात धडपडणाऱ्या नवोदित पत्रकारांना प्रचंड मार्गदर्शन करणारा वेळप्रसंगी सर्व प्रकारे मदतीचा हात देणारा पत्रकार म्हणून शरद अण्णा लोहकरे हे गावकुस चे निरपेक्ष मार्गदर्शक होते त्यांच्या जाण्याने आमच्या पत्रकारिता क्षेत्रावर खूप मोठा आघात झाला अण्णांची उणीव यापुढे कधीच भरून निघणार नाही अशी 'भावना साप्ताहिक गावकूस चे संपादक विष्णू बिचकुले यांनी व्यक्त केली

गावकूस या साप्ताहिकाचे पूर्णपणे म ार्गदर्शक म्हणून शरद (अण्णा) लोहकरे यांच्याकडे पाहिले जायचे अण्णांच्या मार्गदर्शनाखाली गावकुसने ही आपले सडेतोड व स्पष्ट लेखणीच्या माध्यमातून त्या काळात व त्यानंतर पुढे आजपर्यंत अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. गावकुसच नाही तर अनेक छोट्या मोठ्या दैनिकांना साप्ताहिकांना आपल्या मदतीचा कायम हात पुढे

करणारे शरद (अण्णा) लोहकरे यांच्या निधनाने लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या वृत्तपत्र क्षेत्रावर कधीही भरून न निघणारी आपत्ती कोसळली अशी भावना माळशिरस तालुक्यातील सर्वच पत्रकारांमधून व्यक्त हळहळ व्यक्त होत आहे

अकलुज येथील शरदराव विश्वभर लोहकरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. मृत्यू समयी ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पाश्चात दोन मुले, दोन म ली, सुना, जावई, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. अकलुजचे दैनिक लोकमतचे प्रतिनिधी राजीव लोहकरे व दैनिक जनमतचे पत्रकार व प्रेसफोटोग्राफर संजय लोहकरे यांचे ते वडील होते. पत्रकारी क्षेत्रात शरदराव लोहकरे यांचा मोठा हातखंड होते. माळशिरस तालुका व अकलूज परिसरातील झालेल्या विविध कार्यक्रम ाच्या बातम्या दैनिक वृत्तपत्रापासून ते साप्ताहिक वृत्तपत्रापर्यंत जलदगतीने बातमी पोहचविण्याचे काम त्यांनी गेली ३० वर्षापासून केले आहे. वृत्तपत्त क्षेत्रात मुलांचे नाव मोठे व्हावे यासाठी रातोरात एसटीने प्रवास करून मुलांच्या बातम्या व फोटो सोलापूरच्या दैनिकांपर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी केले आहे. वेळप्रसंगी कधी कधी दैनिकांच्या कार्यालयात मुक्काम करून पहाटे दैनिकांच्या गाडी बरोबर अकलूजला येत होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


*टाइम्स 45 न्यूज मराठी. टीमच्या वतीने शरद (अण्णा) लोहकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा