Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ९ डिसेंबर, २०२५

यशवंतनगर येथील महर्षी प्रशालेत राज्यस्तरीय खेळाडूंचा गौरव समारंभ संपन्न

 यशवंतनगर --प्रतिनिधी 

 नाझिया  मुल्ला 

 टाइम्स 45 न्यूज मराठी


महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे विभागस्तर व राज्यस्तरीय नैपुण्य प्राप्त खेळाडू सत्कार समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी स्वरूपाराणी मोहिते पाटील संचालिका शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज , प्रशाला समिती सभापती, ॲड.नितीनराव खराडे तसेच खेळाडू व खेळाडूंचे पालक उपस्थित होते


       सर्व प्रमुख मान्यवरांचे स्वागत महर्षि बाल वाद्यवृंदांच्या बालचमुंमार्फत स्वागत गीताने करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून जिद्द आणि चिकाटीची कास धरून सर्व खेळाडूंनी यश संपादन करून क्रीडा क्षेत्रात प्रशालेचा नावलौकिक वाढविल्याचे सांगितले.

    प्रमुख अतिथी व सर्व गुणवंत खेळाडू यांच्या शुभहस्ते सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.




      4×100रिले,4×400रिले, वेटलिफ्टिंग ,कुस्ती यांसारख्या क्रीडा प्रकारामध्ये विभाग स्तरावर अकरा खेळाडू व राज्यस्तरावर सहा खेळाडूंनी दैदीप्यमान यश संपादन केले. जानवी खांडवे, वैभवी ठोंबरे, अवनी नवगिरे, निशा साठे या राज्यस्तरीय खेळाडूंचा सत्कार समारंभ प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते संपन्न झाला.

   इन्स्पायर अवॉर्ड मध्ये निवड झालेला रुद्रराज जाधव ,बुद्धिबळ आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू सार्थक राऊत ,शिक्षक योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त प्राध्यापक धनंजय देशमुख तसेच मार्गदर्शक शिक्षक अनिल मोहिते, प्रदीप पांढरे ,दादाभाई सय्यद, उमेश बोरावके, अभिजीत बावळे यांचा सत्कार  प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते करण्यात आला.

    प्रमुख अतिथी स्वरूपाराणी मोहिते पाटील संचालिका शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांनी आपल्या मनोगतात संकटांवर मात करून यशाला साद घालणाऱ्या व हिरा बनुन चमकणाऱ्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच फक्त गुणांच्या  मागे न लागता कला ,क्रीडा ,सांस्कृतिक यात आपली आवड जपली पाहिजे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

       खेळाडूंच्या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील, संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील यांनी अभिनंदन केले.

      कार्यक्रमासाठी प्रशाला समिती सदस्य अनिल जाधव, विनोद जाधव, नितीन इंगवले देशमुख व सर्व यशस्वी खेळाडूंचे पालक उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाझिया मुल्ला यांनी केले व आभार बिभीषण जाधव यांनी मानले 

    कार्यक्रमाची सांगता सारे जहाँ से अच्छा या समूहगीताने झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा