*उपसंपादक - नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात लौकिक प्राप्त केलेल्या शंकरनगर येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने मंडळाचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १२ ते १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय समुह नृत्य स्पर्धेला दिमाखात प्रारंभ झाला.
या वेळी मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील, स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष सयाजीराजे मोहिते पाटील, अँड. नितीनराव खराडे पाटील, महादेव अंधारे,वसंत जाधव, परीक्षक योगेश देशमुख (पुणे), कुणाल मसाले (सांगली), प्रेम अर्लीकर (सावंतवाडी), निशा गिरमे, उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील, सचिव बिभीषन जाधव, स्पर्धा प्रमुख विश्वनाथ आवड,संजय गळीतकर आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त स्मृतीभवन शंकरनगर येथे या स्पर्धेचे आयोजन केले आहे
सहकार महर्षी व श्रीमती आक्का साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. महर्षी गीताने स्पर्धेला सुरुवात झाली.
प्रस्ताविकात स्पर्धा प्रमुख संजय गळीतकर म्हणाले, ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी प्रताप क्रीडा मंडळाने संस्थापक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप क्रीडा मंडळ या स्पर्धेचे आयोजन करते. स्पर्धेचे हे ४८ वे वर्ष असून अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी स्पर्धेला नवी दिशा दिली आहे. या स्पर्धेमुळे अनेक चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, लेखक,संगीतकार निर्माण झाले आहेत.
स्पर्धेचा प्रारंभ इयत्ता १ ते ४ थी कॅसेट गीत शहरी या गटाने झाला.
या गटात प्रथम क्रमांक (विभागून)
सदाशिवराव माने विद्यालय, प्राथ. अकलूज व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील प्राथ. शाळा, कोथरुड, पुणे, द्वितीय क्रमांक महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथ.शाळा यशवंतनगर, तृतीय क्रमांक श्री जयसिंह मोहिते-पाटील प्राथ. शाळा, संग्रामनगर यांनी पटकावला.
ग्रामीण गटात
प्रथम क्रमांक जि. प प्राथ शाळा, तांदुळवाडी,
द्वितीय क्रमांक जि. प. प्राथ. शाळा, मुंडफणे वस्ती केंद्र महाळुंग,
तृतीय क्रमांक (विभागून)
जि. प प्राथ. शाळा, विजयवाडी व
विवेक प्राथ. शाळा, पंढरपूर
चतुर्थ क्रमांक (विभागून)
जि. प. प्राथ. शाळा, पिरळे व जिल. प. प्राथ. शाळा, सदाशिवनगर यांनी पटकावला.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा