*मुख्यसंपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी**
*मो:-- 9730 867 448*
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. याच दरम्यान राजकीय वातावरण तापलं आहे. आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत आणि त्याला जशास तशी प्रत्युत्तरं मिळत आहेत. आज उद्धव ठाकरे अधिवेशनात आले होते. त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अमित शाह तसंच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे बाण चालवले. ज्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांना उत्तर दिलं. दरम्यान आमदार आदित्य ठाकरे यांना एकनाथ शिंदेंबाबत प्रश्न विचारला तेव्हा टीका करताना थोडी लाज एकनाथ शिंदेंनी बाळगली पाहिजे असं जोरदार उत्तर आदित्य ठाकरेंनी दिलंय.
एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?
ज्यांनी हिंदुत्व सोडलं, सत्ता आणि खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले पण त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकताही नाही. मी एवढंच सांगेन अमित शाह यांच्यावर आणि आरएसएसवर उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. संघ ही राष्ट्रभक्त आणि देशभक्त संघटना आहे. देशावर संकट आलं तेव्हा त्याची प्रचिती आली आहे. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. ३७० कलम रद्द करणं हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं ते अमित शाह यांनी केलं. त्यांच्याबाबत असं वक्तव्य करणं दुर्दैवी आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबई ज्यांनी अनेक वर्षे लुटली, मुंबईची तिजोरी धुतली आणि कोव्हिड काळात रुग्णांच्या खिचडी गिळली, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातलं डांबर खाल्लं, मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं अशा लोकांनी अमित शाह यांच्याबाबत बोलणं ही शोकांतिका आहे. त्यांचा बॅलन्स गेलेला दिसतो आहे. त्यामुळे ते काहीतरी असंबद्ध बडबड करत आहेत असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. ज्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांना उत्तर दिलं.
एकनाथ शिंदेंनी लाज बाळगून टीका केली पाहिजे-आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी, त्यांना पहिल्यांदा आमदार, मंत्री कोणी केलं? आत हेच विषारी साप आता ॲनाकोंडाला चावायला निघाले आहेत, अशा शब्दात आदित्य यांनी एकनाथ शिंदेंवर जहरी टीका केली.
मुंबईतील पागडी निर्णयावरुनही एकनाथ शिंदेंवर टीका
मुंबईतील पागडी आणि सेस इमारतीसंदर्भात एकनात शिंदेंनी आज विधानसभेत मोठी घोषणा केली. त्यानुसार, भाडेकरूंच्या ताब्यात जेवढे क्षेत्र आहे तेवढाच एफएसआय भाडेकरुंना मिळणार आहे. तर मालकाला भूखंड मालकीपोटी बेसिक एफएसआय देण्यात येईल, त्यासाठी इन्सेटिव्ह एफएसआय दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावरूनही आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली. आज पागडीच्या ज्या घोषणा झाल्या, मंत्र्यांना खातं कळत नाही, बिल्डरधार्जेना निर्णय मंत्र्यांनी घेतला आहे. यासाठी जबादार प्रशासन कोण? म्हाडा की बीएमसी? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. यात पहिले सहा महिने जागा मालकाला, नंतर सहा महिने रहिवाशांना. त्यांनी विकासक आणावे आणि पुर्नविकास करावा. एसआएमध्ये रेरा कायदा झाला, तिथे ५०० स्क्वेअर फूट जागा दिली आहे, असे सांगत घाई-घाईत हे नेहमी निर्णय घेतात, असेही आदित्य यांनी म्हटलं आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा