*अकलूज प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज येथील सिद्धयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेजमध्ये लॅम्प लाइटिंग आणि ओथ टेकिंग सेरेमनी (शपथविधी) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी डॉ.महेशकुमार सुडके (मेडिकल सुप्रीटेंडंट पंढरपूर)तसेच त्यांच्या विद्यमान पत्नी डॉ.सौ.श्वेता महेश सुडके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.तानाजीराव कदम उपस्थित होते
जी एन एम फर्स्ट चा रिझल्ट ९४.८७% तर जी एन एम सेकंड चा रिझल्ट ९४.५९% लागला त्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रज्योत माने सर यांनी नी विद्यार्थ्यांना शपथ दिली.
*गुणवंत विद्यार्थी*
फर्स्ट इयर सायली निलेश वाघमारे ८०.८०%, वैष्णवी कृष्णा हरदाडे ७८%, मयुरी धर्मेंद्र सावंत ७७%, आनंद उत्तम मुंडे ७६%,दत्तात्रय लवटे ७५% ,सेकंड इयर जीएनएम ज्योती महेश ठोकळे ७६.७१%,माया दादासाहेब भोसले ७५.७१ %, सोनम शहाजी भोसले ७५.४२ %,पूजा काशीराम बनसोड ७४.७१ %, लक्ष्मी देवी दिनेश कुमार गुप्ता ७४.५७% या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि बुके देऊन सन्मान करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचाही सन्मान अध्यक्ष आणि पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला
डॉ.महेश सूडके यांनी भाषणात विद्यार्थ्यांचे कौतुक करून संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले तसेच संस्थेचे भवितव्य उज्वल आहे.जास्तीत जास्त परिसरातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे असेही सांगितले याप्रसंगी विद्यार्थ्यांची मनोगते शिक्षकांची मनोगते व्यक्त झाली. संस्थेच्या सचिव डॉ.अंजली कदम यांनी गुणवत्ते बरोबर विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासावर भर दिला पाहिजे यावर भाष्य केले.यावेळी डॉ. सिद्धराज कदम यांनीही विद्यार्थ्यांचा सन्मान केला.
------: जाहिरात:----👇
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्रिन्सिपल कौस्तुभ सुळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रकाश देशमुख आणि अविंदा मगर यांनी केले शेवटी आभार प्रदर्शन प्रकाश देशमुख यांनी केले.या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा