Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

४थे युगस्त्री फातिमाबी शेख साहित्य संमेलन श्रीरामपूर येथे संपन्न होणार

 उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी




संमेलनाध्यक्ष कवयित्री मेहमूदा शेख तर स्वागताध्यक्ष डॉ. सलीम शेख


ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र शाखा श्रीरामपूर यांच्या मार्फत दिनांक ११ जानेवारी २०२६ रविवार रोजी श्रीरामपूर येथे राज्यस्तरीय चौथे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी देहू येथील सुप्रसिध्द साहित्यिक लेखिका मेहमूदा शेख यांची तर स्वागताध्यक्ष डॉ सलीम  शेख तर कार्याध्यक्ष पदी कवयित्री दिलशाद शेख व कवी रज्जाक शेख यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती संस्थेचे सहसचिव अनिसासिकंदर व केंद्रिय उपाध्यक्ष खाजाभाई बागवान यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे

भारतातील पहिल्या मुस्लिम मराठी शिक्षिका युगस्त्री फातिमाबी शेख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या एकदिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ साहित्यिक व ८९ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून  मा. शफी बोल्डेकर, मा. हाशम पटेल, मा. इस्माईल शेख,मा. डॉ. इ. जा. तांबोळी, मा. अय्युब नल्लामंदू, इ उपस्थित राहणार आहेत. यावेळी पुस्तक प्रकाशन, स्मरणिका प्रकाशन,पुरस्कार वितरण,व्याख्यान , कवी संमेलन होणार आहे, मुस्लिम संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासिका प्राचार्या डॉ. सुरैय्या जहागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवीसंमेलन आदी कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.


हे साहित्य संमेलन ऑकॅजिओन बँकवेट हॉल,एच पी गॅस शेजारी,बेलापूर रोड,श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथे होणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने साहित्यप्रेमीनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य  संस्थेच्या वतीने मुख्य संयोजक सलीम शेख,जिल्हाध्यक्ष दिलशाद सय्यद यांनी केले आहे.

या वेळी सकाळच्या सत्रात उदघाटन, मा. इंतेखाब फराश यांच्या सहकार्याने  स्पंदन स्मरणिका प्रकाशन, पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे तसेच ॲड .सिकंदर शेख यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा समाजसेवा पुरस्कार शेख शहाजान फकीर अहमदनगर  यांना प्रदान करण्यात येणार आहे, तर युगस्त्री फातीमांबी शेख साहित्य पुरस्कार कवयित्री साहेरबानू चौगुले आणि मा. हुसेनसाब बागवान यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक व गझलकारा निलोफर फणीबंद यांना प्रदान  करण्यात येणार आहे.

दुपारच्या सत्रात  कवी संमेलन होईल. डॉ सुरैय्या जहागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे ज्यात राज्यातून ५० पेक्षा जास्त कवी सहभागी होणार आहेत.एक दिवसीय फातीमाबी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष सलीम शेख,अ.नगर जिल्हाच्या अध्यक्षा दिलशाद सय्यद ,कार्याध्यक्ष रज्जाक शेख हे प्रयत्नशील आहेत.

                               ----: जाहिरात:----



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा