*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*
बारामती तालुका पोलिसांनी पुन्हा एकदा सक्षम कार्यक्षमता दाखवत हद्दीत चोरी झालेल्या तसेच गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा मोठा मागोवा लावला आहे. एकूण ११ मोबाईल फोन यशस्वीपणे ट्रेस करण्यात आले असून त्यांची एकत्रित बाजार किंमत अंदाजे १ लाख १० हजार इतकी आहे. या कारवाईमुळे गहाळ आणि चोरीच्या घटनांमुळे त्रस्त असलेल्या अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ट्रेस करण्यात आलेल्या मोबाईलपैकी काही मोबाईल संबंधित मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यात अभिजित अनिल जाधव (रा. शारदानगर, बारामती), महेंद्र मुरलीधर दांडे (रा.सूर्यनगरी, बारामती) सोनाली संतोष सातपुते (रा.बारामती), संजय काशिनाथ अहिरराव (रा.सूर्यनगरी, बारामती) यांचा समावेश आहे.
इतर मोबाईल धारकांशी संपर्क साधून मोबाईल सुपूर्द करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पोलीस अंमलदार राजू बन्ने आणि पोलीस अंमलदार अविनाश भागवत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मोबाईल ताब्यात देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार उपनिरीक्षक अमोल कदम दिपाली गायकवाड धनश्री भगत युवराज पाटील उपस्थित होते. मोबाईल ट्रेसिंगसाठी तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर, विविध प्रकारे मिळालेल्या क्ल्यूजचा अचूक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे हा मुद्देमाल वसूल करण्यात पोलिसांना यश आले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा