अकलूज प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्यूज मराठी
शंकरराव मोहिते महाविद्यालयात आज अँटी रॅगिंग व अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने अँटी रॅगिंग मार्गदर्शन अधिकार व कायदे या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून अकलूज पोलीस स्टेशनचे निर्भया पथकाचे प्रमुख समाधान देशमुख यांना आमंत्रित करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर हेड पोलीस कॉन्स्टेबल सुहास क्षीरसागर हेही उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवप्रसाद टिळेकर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातुन रॅगिंगचे होत असलेले प्रकार त्याच्या संदर्भात दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण व कायद्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.यासाठी महाराष्ट्र सरकारने १९९९ मध्ये केलेल्या कायद्याची माहिती त्याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये नोंद होत असणारे गुन्हे यांचे प्रमाण लक्षात घेतले तर यामध्ये तरुण मुलांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.यासाठी तरुण विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांचे आणि शिक्षकांचे विचार आत्मसात केले तर त्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारचे अडचणी येणार नाहीत.त्याचबरोबर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण होणारे धोके याविषयी माहिती देऊन त्यांना आलेले अनुभव विद्यार्थ्यांना कथन केले.त्यासाठी विद्यार्थ्यांनी आभासी जीवनात जगू नये. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या समाजसुधारकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा असेही आवाहन केले. त्याचबरोबर त्यांनी दैनंदिन जीवनात व्यायामाचे महत्त्व देखील सांगितले.
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून अँटी रॅगिंग व अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या संदर्भात महाविद्यालयात वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून उपाययोजना करून महाविद्यालय परिसर भयमुक्त आणि सन्मानपूर्वक ठेवण्यासाठी संस्था पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल्याचे सांगितले.त्यामुळे विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात अध्ययन करावे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारची ऊर्जा आहे त्याचा वापर विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टीसाठी करावा महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक वर्गाचे मेंटार मेंटी ग्रुप तयार करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे विद्यार्थी संबंधीत शिक्षकांना आपल्या अडचणी सांगून आपल्या समस्या सोडवू शकतात.विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, परंतु त्यासाठी आपलं चारित्र्य चांगलं असलं पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी चुकीच्या मार्गांचा वापर करू नये असे आवाहन केले.या कार्यक्रमात अभिप्राय देण्यासाठी महाविद्यालयातील वैष्णवी चव्हाण व राजू देवकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी अँटी रॅगिंग समिती व अंतर्गत तक्रार निवारण समितीतील सर्व सदस्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सज्जन पवार उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.चंद्रशेखर लोंढे यांनी केले तर सूत्रसंचलन डॉ.सविता सातपुते यांनी तर आभार प्रा.स्मिता पाटील यांनी मानले.या कार्यक्रमासाठी ज्युनिअर आणि सिनियर महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा