*मुख्यसंपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी**
*मो:-- 9730 867 448*
Why No Room 13 in Hotels : कधी तुम्ही हॉटेलमध्ये चेक-इन करताना लिफ्टचे बटण पाहिले आहे का? १० वा… ११ वा… १२ वा मजला दिसतो, पण १३ वा? आश्चर्य म्हणजे हा क्रमांकच गायब असतो! एवढंच नाही, अनेक हॉटेल्समध्ये रूम नं. १३ हे खोलीचे नावसुद्धा ठेवले जात नाही. हा सर्व काही योगायोग नाही… तर शतकानुशतके मनात घर करून बसलेल्या एका वेगळ्या भीतीचा परिणाम आहे.
जगभरातील अनेक हॉटेल्समध्ये १३ हा आकडा मुद्दामच टाळला जातो. खोलींच्या क्रमांकात, मजल्यांच्या नावांमध्ये, अगदी काही ठिकाणी प्रचारपत्रकातही हा नंबर दिसणार नाही. या भीतीला म्हणतात ट्रिस्काइडेकाफोबिया म्हणजे १३ या आकड्याची भीती!
हॉटेल उद्योगात आराम, विश्वास व सुरक्षितता यांना सर्वांत जास्त महत्त्व दिलं जातं. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाकडून ग्राहकांना अस्वस्थ वाटेल अशी कोणतीही गोष्ट टाळली जाते. आणि १३ हा आकडा त्यातलीच एक बाब!
हॉटेलमध्ये '१३ नंबरची रूम' का नसते?
व्यावसायिकदृष्ट्या पाहता, १३ क्रमांक टाळणे हे हॉटेल्ससाठी फायदेशीर ठरते. कारण- काही ग्राहक १३ क्रमांक असलेली खोली बुक करायलाच तयार नसतात. त्यामुळे तो नंबर ठेवण्यापेक्षा थेट १२ नंतर १४ हा क्रमांक देण्यातच बहुतेकांना शहाणपण वाटते.
Otis Elevators च्या अंदाजानुसार, त्यांच्या लिफ्ट असलेल्या ८५% इमारतींमध्ये १३ वा मजला दाखवलेलाच नसतो. काही ठिकाणी १३ वा मजला 12A, तर काही ठिकाणी 'M'- म्हणजे इंग्रजी वर्णमालेतील १३ वे अक्षर अशा नावांनी दाखवला जातो.
भारतामध्ये या आकड्याची भीती पाश्चात्त्य देशांइतकी जड नाही… पण विदेशी पर्यटकांचा विचार करून अनेक भारतीय हॉटेल्सही हा पॅटर्न पाळतात.
लोक १३ नंबरला का घाबरतात? मनोविज्ञान सांगतं मोठं रहस्य
ही बाब फक्त अंधश्रद्धेमुळे नाही, तर मनोविज्ञानात Cognitive Ease नावाची एक संकल्पना आहे. लोक साधे, परिचित आणि मनाला शांत वाटणारे वातावरण पसंत करतात. 'रूम १३' हे नाव ऐकूनही काही जणांना नकळत अस्वस्थता वाटते. त्यामुळे पर्यटक वा ग्राहकांचा अनुभव बिघडू नये म्हणून हॉटेल्स सरळ तो नंबरच काढून टाकतात. बुकिंग साइट्सवरदेखील रूम नं. १३ ची बुकिंग दर इतर खोलींपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे.
१३ या आकड्याची भीती कशी जन्माला आली?
* ही भीती नवीन नाही; तिचा इतिहास शेकडो वर्षांपूर्वीचा आहे.
* नॉर्स मिथॉलॉजी – बारात १२ देवांचे भोजन सुरू असताना अचानक १३वा पाहुणा दुष्ट देव लोकी दाखल झाला. त्याच्या आगमनानंतर आनंददेव बाल्डरचा मृत्यू झाला.
* ख्रिश्चन कथन – शेवटच्या भोजनाच्या वेळी येशू आणि १२ शिष्यांमध्ये 'जुडास' हा १३वा आणि विश्वासघातकी ठरला.
* प्राचीन बाबिलोनी – Code of Hammurabi च्या यादीत १३ हा क्रमांक अचानक गायब; चूक होती की उद्देश, अजूनही निश्चित नाही.
* या कथांनी १३ ला अशुभतेचं प्रतीक बनवलं.
चित्रपटांनी १३ ची भीती अजून वाढवली
'Friday the 13th' सारख्या हॉरर चित्रपटांनी १३ या आकड्याला भीतीचं ब्रँडिंगच करून टाकलं. लोकप्रिय कादंबऱ्या, कथा, थरारक चित्रपटांनी या आकड्याभोवती आणखी गूढ गोष्टी पसरवल्या.
फक्त १३ नाही… या रूम नंबरलाही हॉटेल्स टाळतात
* ४२० – गांजाच्या संस्कृतीशी जोडला जातो.
* ६६६ – ख्रिश्चन धर्मात 'अशुभ' म्हणून प्रसिद्ध.
* ९११ – आपत्ती सेवा किंवा ९/११ हल्ल्यांची आठवण.
म्हणून तुम्हाला ४१९ नंतर ४२१ दिसलं तरी आश्चर्य करू नका!
गायब झालेलं 'रूम १३' आपल्याबद्दल काय सांगतं?
हॉटेलच्या लिफ्टमध्ये १३ असा बटण नसणे हे फक्त डिझाइनचं वैशिष्ट्य नाही… तर आपल्या मनातील शतकानुशतकांच्या भीती, कथा, धार्मिक श्रद्धा आणि आधुनिक हॉटेल व्यवसायाचा संगम आहे.
आणि कधीतरी तुम्हाला 'रूम नं. १३' मिळालीच… तर? कदाचित तो मुक्काम तुमच्या आयुष्यातील सर्वांत संस्मरणीय ठरेल!





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा