Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ८ डिसेंबर, २०२५

प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन

 *अकलुज ---प्रतिनिधी*

 *बाळासाहेब गायकवाड*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*



कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात लौकिक प्राप्त केलेल्या शंकरनगर येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने मंडळाचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १२, १३ व १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत शालेय मुला-मुलींच्या व महाविद्यालयीन गटासाठी राज्यस्तरीय समुह नृत्य स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती  मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी दिली.या वेळी स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष सयाजीराजे मोहिते पाटील उपस्थित होते.

                सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त स्मृतीभवन शंकरनगर येथे या स्पर्धेचे आयोजन केले असून सदरच्या स्पर्धा एकूण पाच गटात होणार आहेत. गट पहिला इयत्ता १ ते ४ थी कॅसेट गीत, गट दुसरा इयत्ता  ५ वी ते ७ वी कॅसेट गीत (पारंपारिक लोकनृत्य), गट तिसरा इयत्ता८वी ते१०वी ग्रामीण बॉलीवूड डान्स आणि कॅसेट गीत शहरी (पाश्चिमात्य), गट चौथा इयत्ता ५वी ते१०वी कॅसेट गीत (प्रासंगिक नृत्य थीम डान्स) व गट पाचवा इयत्ता११वी ते सर्व महाविद्यालयीन (प्रासंगिक थीम डान्स) हे गट आहेत.




 शहरी गट, ग्रामीण गट अ, व ग्रामीण गट ब अशा तिन्ही गटासाठी स्वतंत्र आकर्बषक बक्षीसे असून  सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

प्रताप क्रीडा मंडळाने अनेक नामवंत कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, नृत्य कलाकार निर्माण केले असून आज ते विविध माध्यमांतून कार्यरत आहेत.

 मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील, सचिव बिभीषण जाधव, स्पर्धा प्रमुख डॉ. विश्वनाथ आवड, संजय गळीतकर, दिलीप शिर्के, विजय निंबाळकर यांच्यासह सर्व संचालक, सदस्य या स्पर्धे साठी कार्यरत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा