इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी.
सहसंपादक, मो. 9922419159
महात्मा फुलेनगर ( बिजवडी ता. इंदापूर ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व सहयोगी ओंकार शुगर अँड डिस्टिलरीचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५-२६ च्या चालू गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन ३३५० रुपये प्रमाणे उच्चांकी दर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिला हप्ता ३२०० रुपये प्रमाणे असून, उर्वरित १५० रुपये प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीला अदा केली जाईल, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना उत्कृष्टपणे चालू असून आज अखेर कारखान्याने १६५००० मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. या कारखान्याच्या माध्यमातून व ओंकार शुगर च्या सहयोगातून सहकार टिकविण्याचा हा देशातील पहिलाच नाविन्यपूर्ण पथदर्शी उपक्रम असून सहयोगातून सहकारातील शेतकरी, कामगार टिकवण्याचे काम यशस्वीपणे केले जात आहे.
जाहिरात 👇
ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांच्या माध्यमातून प्रति टन ३३५० रुपये प्रमाणे उच्चांकी दर देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस हा कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टिलरीस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन देखील हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
"जाहिरात*👇
कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखाना हा गेले आठ ते दहा वर्षापासून आर्थिक अडचणीला सामोरे जात होता. तरी देखील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन येणाऱ्या आर्थिक अडचणीवर मात करून प्रत्येक गळीत हंगाम यशस्वी व्हावेत, असे प्रयत्न अडचणीच्या काळात ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने सुरू होते. बदलत्या परिस्थिती नुसार शेतकऱ्यांचे सर्वोच्च हित लक्षात घेऊन कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखाना व ओंकार शुगरचा सहयोग हा (कोलाब्रेशन ) सहकारातील सेक्शन २० नुसार सहकार टिकवण्यासाठीचा पहिलाच नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी होत आहे. सदरच्या संयुक्त तत्वाच्या निर्णयासाठी सभासदांचे सहकार्य लाभले आहे. श्रद्धेय शंकररावजी पाटील उर्फ भाऊंनी उभारलेल्या या संस्थेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे गेली ३५ वर्षे संसार प्रपंच यशस्वीरित्या मार्गी लागले आहेत. त्यातून शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती झाली आहे. त्यामुळे कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्यास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित मिळून काम करू या, असे प्रतिपादन शेवटी हर्षवर्धन पाटील यांनी केले. यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक विजय शिर्के उपस्थित होते.
कर्मयोगी कारखान्याने ३३५० रुपये पहिली उचल जाहीर करून जिल्ह्यात दर देण्याबाबत आघाडी घेऊन सर्वांना चकित केले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक दर देणाऱ्या माळेगाव व सोमेश्वर कारखान्याने पहिली उचल ३३०० रुपये जाहीर केली आहे तर छत्रपती सहकारी व नीरा भीमा कारखान्याचे पहिली उचल ३१०० रुपये जाहीर केली आहे. त्यामुळे ज्यादा दर देण्याची स्पर्धा जिल्ह्यात कारखान्यात सुरू झाली आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक न्याय मिळत आहे. कर्मयोगी कारखान्याने यापूर्वी असा दर दिला असता तर हर्षवर्धन पाटील विधानसभा निवडणुकीत पडले नसते अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत !







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा