Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ९ डिसेंबर, २०२५

श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय, कोथरूड, पुणे येथे विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी व्यापक अग्निसुरक्षा व प्रथमोपचार जनजागृती प्रशिक्षणाचे आयोजन

 पुणे --प्रतिनिधी

टाइम्स 45 न्यूज मराठी 



दि. 8 डिसेंबर 2025 रोजी MYV इंजिनिअरिंग अँड रिसर्च फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय, कोथरूड, पुणे येथे विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी व्यापक अग्निसुरक्षा व प्रथमोपचार जनजागृती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. फाउंडेशनकडून असे जनजागृती उपक्रम या विद्यालयात सातत्याने राबवले जात असून यंदाचे सत्र अधिक माहितीपूर्ण व उपयुक्त ठरले.


संस्थेच्या संचालिका साविता लांगडे आणि संचालिका योगिता जोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली EHS स्वयंसेवकांनी शाळा सुरक्षेचे महत्त्व सांगून विविध विषयांवर सविस्तर प्रशिक्षण दिले. यात आगीचे प्रकार, फायर एक्स्टिंग्विशरचे प्रकार, पोर्टेबल अग्निशामक यंत्राचा योग्य वापर करून आग कशी विझवावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आले.





यासोबतच मूलभूत प्रथमोपचार विषयांवर—साप चावणे, बर्न इजा, हाडांचे फ्रॅक्चर, विषबाधा इत्यादी आपत्कालीन परिस्थितीत कसे हाताळावे याची माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना बेसिक लाइफ सपोर्ट (BLS) आणि सीपीआर (CPR) प्रात्यक्षिक दाखवून जीव वाचविण्याच्या प्राथमिक पद्धती शिकवण्यात आल्या.





या प्रसंगी मुख्याध्यापिका कु.जयश्री जावळे, सहशिक्षक श्री कारोटे सर, श्री पठाण सर श्री खंडागळे सर शिक्षकेतर कर्मचारी श्री.आत्राम सर सेवक श्री विजय बाविस्कर श्री.सच्चीदानंद निळकंठ उपस्थित होते आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा