*कार्यकारी संपादक --एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो---83180811147.*
इंदापूर तालुक्यातील बावडा येथे शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संस्थेच्या महत्त्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी अंतर्गत येणाऱ्या रत्नाई कृषि महाविद्यालय ,अकलूज अंतर्गत दिनांक 9 डिसेंबर रोजी गावात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला.चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या कृषीकन्या यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली.
महाविद्यालयाच्या वतीने येथे कृषि कार्यानुभव कार्यक्रम पुढील सहा महिने राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत कृषिदुतांनी गावातील शेतकरी बांधवांना शेतीमधील नवीन माहिती देण्यात येईल असे सांगितले गेले . आणि शेतकरी बांधवांना पिकाच्या लागवडी पासून ते काढणीपर्यंत थोडक्यात, माहिती दिली.यावेळी मा. सौ .पल्लवी गिरमे (सरपंच) मा .श्री .रणजीत घोगरे (उपसरपंच) मा. सौ. अंबिका पावसे (ग्रामसेवक), अक्षय कुंभार (कृषिसाहायक अधिकारी ) ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रगतशील शेतकरी आणि समस्त शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते , कृषीकन्या साक्षी बोराटे, सुनैना जाधव, प्रतीक्षा जाधव, श्रद्धा जाधव, श्रद्धा इंगोले, अनामिका कोळेकर, प्राची कोंढाळकर, कीर्ती कोळी यांनी सहभाग नोंदवला .कार्यक्रमास प्राचार्य आर. जी. नलावडे (प्राचार्य, रत्नाई कृषि महाविद्यालय अकलूज) एस. एम .एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक) व प्रा.एम. एम. चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) प्रा .एच. वी .खराडे (कार्यक्रम अधिकारी)यांचे मार्गदर्शन लाभले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा