Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २८ डिसेंबर, २०२५

*ब्रेकिंग न्युज:- सोलापुरात राजकीय खळबळ ; फारूक शाब्दि यांचा एमआयएम शहराध्यक्ष पदासह सदस्यपदाचा राजीनामा*

 *सोलापूर --प्रतिनिधी*

*आंबिद  बागवान*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



सोलापुरात राजकीय खळबळ ; फारूक शाब्दि यांचा एमआयएम शहराध्यक्ष पदासह सदस्यपदाचा राजीनामा

सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर अतिशय मोठी राजकीय घडामोडी सोलापुरात समोर आली आहे. सर्वांचे लक्ष लागलेल्या एमआयएम पक्षाचे शहराचे अध्यक्ष फारुख शापदी यांनी एमआयएम पक्षाच्या शहराध्यक्ष पदासह आपल्या सदस्य पद आणि मुंबई अध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.

एकीकडे युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडी झाली. त्याच पार्श्वभूमीवर एमआयएमची भूमिका समोर आली नाही. त्यामुळे वादळापूर्वीची शांतता अशी चर्चा ऐकण्यास मिळाली.



एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष फारूक शाब्दि यांच्या भूमिकेकडे संपूर्ण शहराचे आणि राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. पण शाब्दी यांनी महापालिकेच्या तोंडावर सर्वांनाच जोरदार धक्का दिला असून आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी दिला आहे

पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या नावाने पत्र पाठवून त्यांनी आपल्या सदस्य पदासह शहराध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा दिला आहे.

                          ****जाहिरात*****




यामुळे एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. महापालिका तोंडावर अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने आता एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते काय निर्णय घेणार, पक्षाची सूत्रे सोलापुरात वरिष्ठ नेते कोणाच्या हातात देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा