अकलूज प्रतिनिधी
केदार लोहकरे
*टाइम्स 45 न्यूज मराठी
ना शासनाचा आधार...ना मुलांचा सहारा...! अशा निराधार दगडाबाई दगडु नेटके वय ८० या भीक मागून जगणा-या वयोवृद्धेला जयसिंह मोहिते पाटील यांनी चौकशी करुन आर्थिक मदतीचा आधार देत ख-या अर्थाने जाणता राजा असल्याचे सिद्ध केले.
अकलुज येथील वयोवृद्ध पत्रकार शरदराव विश्वंभर लोहकरे यांच्या निधनाबद्दल लोहकरे परिवाराच्या सांत्वनासाठी जयसिंह मोहिते पाटील आले असताना जाता जात महात्मा फुले भाजी मंडईतुन जात असताना त्यांनी भाजी विक्रेत्यांना उन,पाऊस लागु नये म्हणून अकलुज ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भाजी विक्री करण्यासाठी खुले गाळे दिले होते. त्याची कृतज्ञता म्हणून भाजी विक्रेते त्यांना राम राम घालत होते.दरम्यान वयोवृद्ध एका फळ विक्रेते महिलेचे सर्व फळे खरेदी केले तर दगडाबाई नेटके या भीक मागणा-या वयोवृध्द अंध महिलेची आस्थेने विचारपूस करीत शासकीय निराधार योजना मिळतात का ? विचारुन त्या देण्यासाठी कार्यकर्त्यांना सांगुन दगडाबाई नेटके यांना अर्थिक मदत आधार देत ख-या अर्थाने अकलुजकरांनी दिलेली जाणता राजा ही पदवी सार्थ ठरवली.
अकलूज गावच्या विकास व प्रगतीमध्ये ज्यांचे बहुमोल योगदान राहिलेले अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जयसिंह मोहिते- पाटील यांनी आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत अकलूज गावचा खरा विकास झाला होता.आज महात्मा ज्योतीबा फुले भाजी मंडईत फिरत असताना भाजी विक्रेत्यांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा