Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ६ डिसेंबर, २०२५

सोलापूर जिल्हा युवा सेना (पंढरपूर विभाग)च्या वतीने विविध मागण्यासाठी ७ डिसेंबर रोजी -गट नंबर २- येथे रास्ता रोको आंदोलन

 संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448


अकलूज टेंभुर्णी रोडवरील   गट नंबर  दोन येथील जाधववाडा हॉटेल समोर स्पीड ब्रेकर करून द्यावेत आणि अकलूज अकलाई कॉर्नर पालखी मार्गावर स्पीड बेकर करून द्यावेत तसेच अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ मिळावे या तीन मागणीसाठी रविवार दिनांक ७/१२/२०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता  गट नंबर दोन येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे सोलापूर जिल्हा युवा सेना प्रमुख गणेश इंगळे यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता रस्ते विकास महामंडळ विभाग पुणे,- प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग पंढरपूर,- कार्यकारी अभियंता PW D अकलूज, तहसीलदार तहसील कार्यालय माळशिरस यांना कळविले असून




याबाबत सविस्तर मागणी अशी की

अकलूज टेंभुर्णी रोडवरील दोन नंबर गट जाधववाडा येथे अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे तसेच अकलूज अकलाई कॉर्नर पालखी मार्गावर ही अपघाताचे प्रमाण वाढले आहे अनेक जण अपघातामध्ये मयत झाले आहेत त्यामुळे या दोन ठिकाणी स्पीड ब्रेकर तात्काळ करून मिळावेत तसेच माळशिरस तालुक्यात अतिवृष्टीने हजारो शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करून बरेच महिने झाले तरीही अजून हजारो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही ती नुकसान भरपाई तात्काळ मिळावी या व इतर वरील सर्व  मागणी साठी रविवार दिनांक ७/१२/२०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता दोन नंबर गट जाधववाडा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनाद्वारे कळविले आहे




  कळावे 

गणेश भजनदास इंगळे

युवा सेना सोलापूर जिल्हा प्रमुख (पंढरपूर विभाग)

    मो:-9850 611834


ر

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा