Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

*अकलूज नगरपरिषदेत महिला बचत गटाच्या दोन अध्यक्षांची दमदार एन्ट्री.* *एक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष तर दुस-या भाजप च्या उमेदवार विजयी.*

 *ज्येष्ठ पत्रकार -संजय लोहकरे*

*टाइम्स45 न्यूज मराठी*

                  प्रतिभा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस👇


अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये अकलूज येथील महिला बचत गट व यशवंतनगर येथील महिला बचत गटाच्या अध्यक्ष यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवली.नगरपरिषदेच्या चुरशीच्या निवडणुकीत त्या दोन्ही महिला अध्यक्षांनी यश प्राप्त केले आहे. आज या दोन्ही महिला अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्या नगरसेविका पदाच्या मानकरी झाल्या आहेत. त्यामुळे बचत गटातील महिला वर्गातून आनंदाचे वातावरण पसरले आहे.

                    जयश्री एकतपुरे भाजपा 👇



             अकलूज येथील लोकायत लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा सौ.प्रतिभा विलासानंद गायकवाड यांनी अकलूज नगरपरिषदेची नगरसेवक पदाची निवडणूक ९ ब प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे लढवली होती तर यशवंतनगर येथील सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा सौ.जयश्री संजय एकतपुरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने १३ ब प्रभागातून निवडणूक लढवली होती.या दोन्ही अध्यक्ष महिलांनी सहज विजय मिळवत यश संपादित केले आहे.त्यामुळे दोन्ही लोकसंचलित साधन केंद्रातील महिला बचत गटातील महिला आनंदीत झाल्या आहेत.

             एका लोकसंचलित साधन केंद्रात साधारण ४५० ते ५०० महिला बचत गटात असतात.त्या सर्व बचत गटात एकूण पाच हजार महिला सभासद असतात.दरवर्षी या महिला बचत गटातील महिला व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडून दहा कोटीचे कर्ज कमी व्याज दरात उपलब्ध होत असल्यामुळे महिला वर्ग विविध व्यवसाय सुरू करून त्यांची आर्थिक प्रगती झाली असून त्या स्ववलंबी झाल्या आहेत.त्याचा लाभ अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत सौ.प्रतिभा गायकवाड व सौ.जयश्री एकतपूरे यांना झाला आहे.

                            *****जाहिरात******👇



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा