*अकलूज प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
घेरडी (ता.सांगोला) येथील आदर्श शिक्षक केराप्पा टोपा जगधने (के.टी) यांचे वृध्दापकाळाने त्यांचे दु:खद निधन झाले आहे.मृत्यूसमयी ते ९८ वर्षांचे होते.यांच्या पश्चात पत्नी,२ मुले,३ मुली,१० नातू, ८नाती,१८ पणती व पंतु असा परिवार आहे.त्यांनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये पैलवानकी केली होती.त्यांचे अक्षर सुंदर असल्यामुळे ते साइन बोर्ड पेंटिंग व चित्रकला पेंटिंगमध्ये काम केले होते.गवंडीचे काम केले होते.त्यांचे संघरत्ना सायकल मार्ट नावाचे सायकलचे दुकान होते.पाण्याचे इंजिन दुरुस्तीचे काम ते अतिशय कुशलतेने करत होते.त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतल्या नंतर दोन वर्ष करमाळा येथे शिक्षकांचे ट्रेनिंग घेऊन ते शिक्षक झाले.जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक शिक्षकाची नोकरी करत आष्टी,करमाळा,इटकी येथे अध्यापनाचे काम केले.पुढे माळशिरस तालुक्यात मांडकी,रेडे येथे मुख्याध्यापक म्हणून कामकाज पाहिले.त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार आष्टी येथे महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या शभहस्ते मिळाला होता.त्यानंतर ते उत्कृष्ट केंद्रप्रमुख म्हणून घेरडी (ता.सांगोला) येथे शिक्षण क्षेत्रातून निवृत झाले.त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली व ते आंबेडकरवादी चळवळीमध्ये सामील झाले ते मोडी लिपीचे जाणकार व तज्ञ म्हणून सांगोल्यामध्ये काम पाहत होते तसेच ते उत्कृष्ट पेटी वादक होते व भजनी मंडळाची आवड असणारे एक रसिक होते.त्यांनी दिपक आबा साळुंखे यांच्या सोबत देखील राजकीय कामकाज पाहिले होते. माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका श्रीमती शोभा केराप्पा जगधने (शिवशरण) यांचे ते वडील होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा