*सहसंपादक -डॉ. संदेश शहा (इंदापूर)*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9922 419 159*
संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर इंदापूर अकलूज रस्त्यावर इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती शेजारी सीएस सीएनजी गॅस स्टेशनचा भव्य शुभारंभ संपन्न झाला. टोरेंट कंपनीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हे सीएनजी स्टेशन एकाच वेळी ताशी २० वाहनांना गॅस सेवा देण्यास सक्षम आहे. या मार्गाने येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना त्याचा निश्चित लाभ होणार आहे. इंदापूर तालुक्यातील इंदापूर ते अकलूज मार्गावरील हा पहिलाच पंप व स्टेशन असून त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या गॅस स्टेशन ला भेट देऊन श्री. दोशी परिवार यांना शुभेच्छा दिल्या.
इंदापूर नगरपरिषदेचे नूतन नगराध्यक्ष भरत शहा, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त मुकुंद शहा, माजी नगराध्यक्ष अशोकराव इजगुडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार
गुजर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे, नवनाथ रूपनवर, सचिन सपकळ, शिवाजीराव तरंगे, रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन शहा, मुकुंद कन्हैयालाल शहा, अमोल शहा, जावेद शिकलकर, प्रमोद राऊत, पिंटूशेठ दोशी, महावीर शहा, उत्कर्ष दोशी, प्रशांत शहा, सुकुमार दोशी, संजय मोरे, श्री. पाटील साहेब, विठ्ठल महाडिक, मंत्री दत्तात्रय भरणे यांचे ओएसडी डॉ. लहू वडापुरे, मदतनीस अनिकेत जाधव या मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी नुतन नगराध्यक्ष भरत शहा म्हणाले, सध्या सर्वत्र प्रदूषण वाढत चालले असल्याने त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. त्या पार्श्वभूमीवर
हवा प्रदूषणापासून वाचण्यासाठी हरित इंधन ही काळाची गरज आहे. या गॅस स्टेशनचे संचालक संजय दोशी व ईशान दोशी यांनी काळानुरूप स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
------: जाहिरात:-----👇
बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे म्हणाले, हरित इंधनामुळे पर्यावरण संतुलन होण्यास मदत होणार असून त्यामुळे प्रदूषित हवेमुळे होणारे विविध आजार कमी होण्यास मदत होणार आहे. इंदापूर शहराची गरज ओळखून उद्योजक संजय दोशी व त्यांचे चिरंजीव ईशान दोशी यांनी हा कौतुकास्पद व्यवसाय सुरू केला आहे.
संजय दोशी म्हणाले, सीएनजी हे स्वस्त, पर्यावरणपूरक व भविष्याचा विचार करणारे इंधन आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच टोरेंट कंपनीच्या दर्जेदार सेवेमुळे ग्राहकांना जलद, सुरक्षित व सातत्यपूर्ण गॅस पुरवठा मिळणार आहे. एकाच वेळी २० वाहनांना गॅस भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने इंदापूर साठी ही अभिमानाची बाब आहे. स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि इंदापूरच्या विकासास हातभार लावणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.
ईशान दोशी म्हणाले, हरित इंधनाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणा सोबतच इंदापूरच्या औद्योगिक व व्यापारी विकासाला चालना देण्याचा आमचा संकल्प आहे. कारण
सीएनजी हे भविष्याचे इंधन आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी सीएस सीएनजी गॅस स्टेशनला भेट देऊन उपलब्ध सुविधा याची पाहणी करून दोशी कुटुंबाचे अभिनंदन केले. टोरेंट कंपनीचे वरिष्ठ अधिकारी नितीन कांबळे, नितीन कळमकर व सहकाऱ्यांनी या गॅस स्टेशनची तांत्रिक माहिती उपस्थित सर्व मान्यवर यांना दिली.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा