*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी**
*मो:-- 9730 867 448*
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून अकलूज येथे माळशिरस तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले
या स्थापना दिनाच्या निमित्त गिरीश शेटे यांनी काँग्रेस पक्षाचा इतिहास सांगून पक्ष बांधणी संदर्भात व निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन करून पक्ष आणि संघटना मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षासाठी जोमाने कार्य करावे असे अध्यक्ष शेटे यांनी उपस्थितांना आवाहन केले या काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त हजारे मॅडम यांनी शेतीविषयक आणि आरोग्य विषयक मार्गदर्शनपर माहिती दिली तसेच ज्येष्ठ नागरिक व पत्रकार म्हणून भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांचा सत्कार करण्यात आला,तर संतोष कांबळे यांनी मुलांना शाळेला जाण्यासाठी रस्ता नव्हता म्हणून आपल्या स्वतःच्या जागेतून मुलांसाठी रस्ता उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला
या स्थापना दिनानिमित्त जिलेबी वाटप आणि उपस्थितांना रोप वाटप करण्यात आले
याप्रसंगी पंचायत राज्य जिल्हा संघटक व माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका उपाध्यक्ष रमेश नामदास काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब मगर व राजाभाऊ गायकवाड यांनी आज देशाला काँग्रेस पक्षाची गरज का ?आहे याचे विश्लेषण केले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा सरचिटणीस साजिद भाई सय्यद व बहुसंख्येने नागरिक व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा