*अकलूज प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
जीवाभावाच्या माणसांना भेटल्यानंतर आनंदाला उधाण आणणारा सोहळा म्हणजे मॉर्निंग ग्रुप अकलूज यांच्या स्नेह भेटीचा सोहळा अकलूज येथील आई श्री रिसॉर्टमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.
सहकुटुंब आयोजित केलेल्या या स्नेहसंमेलनाची सुरुवात सदस्यांचे आई-वडीलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन व दिप प्रज्वलनाने झाली.ग्रुपचे सदस्य राहुल पवार यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की,शेती,उद्योग, व्यापार,शिक्षण,वैद्यकीय,पोलीस, मार्केटिंग,बँकिंग,एलआयसी इ. क्षेत्रातील शिलेदार व्यायामाच्या माध्यमातून आपली शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती वाढवण्यासाठी रोज विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज येथे येऊ लागले. सहवास अन् संपर्क वाढत जाऊन पुढे मैत्रीचे घट्ट नाते निर्माण झाले अन् त्यातूनच हा मॉर्निंग ग्रुप उदयास आल्याचे सांगितले.या ग्रुपच्या सदस्यांनी आजपर्यंत ३६ गड-किल्ल्यांचे यशस्वी रित्या ट्रेकिंग केले असून गरजू विद्यार्थी,पूरग्रस्त, वृद्धाश्रम-अनाथाश्रम यांना मदत केली असून यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करत प्रोत्साहन दिल्याचे सांगितले.यापुढील काळातही वृक्षारोपण,शिक्षण,आरोग्य,महिला जनजागृती,पर्यटन इत्यादी क्षेत्रात काम करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ.फारुख शेख यांनी सहकाऱ्यांसोबत सादर केलेली गणेश वंदना लक्षवेधी ठरली. समाधान देशमुख,सौ.सोनाली पाटील,कांतीलाल एकतपुरे,सुहास क्षीरसागर,डॉ.हरिश्चंद्र सावंत- पाटील,सौ.वनिता कोरटकर,विशाल घाडगे यांनी सादर केलेल्या मराठी- हिंदी सदाबहार गाण्याने मंत्रमुग्ध झालेल्या श्रोत्यांनी चांगलाच ताल धरला.
सौ.वनिता कोरटकर यांनी सादर केलेल्या शिवगर्जनेने क्षणभर सर्वांच्याच अंगावर काटा आला. समता जाधव,काजल गायकवाड, कु.ज्ञानदा पवार कु.अनाया शेख व समर्थ जाधव यांच्या नृत्याविष्कारास प्रेक्षकाची चांगलीच दाद मिळाली.
त्याच बरोबर बाळासाहेब माने यांचे मेंडोलियन वादन,तसेच हरिश्चंद्र सावंत-पाटील,डॉ.शिरीष रणनवरे, सौ सुनीता क्षीरसागर यांनी सादर केलेल्या कवितानी सर्वांनाच अंतर्मुख केले.आपआपल्या क्षेत्रात विशेष प्राविण्य व उत्कृष्ट कामगिरी करणारे सदस्य व त्यांच्या पाल्यांचा गौरव सोहळा कार्यक्रमातील एक आकर्षणाचा क्षण ठरला.अंतिम टप्प्यात विविध गाण्यांवर सर्वांनी केलेला डान्स सोहळ्याचा उत्साह वाढवून गेला.
-----: जाहिरात :-----👇
कार्यक्रमाच्या शेवटी विजय पाटील यांनी आपल्या खास शैलीत आयोजक,सूत्रसंचालक,वादक, सिस्टीम वाले व सहकुटुंब उपस्थित राहिलेल्या सर्व सदस्यांचे आभार मानले.सर्वार्थाने यशस्वी ठरलेल्या आनंद सोहळ्याचे सूत्र संचालन डॉ.शबाना शेख,नूरजहाँ शेख मॅडम,राहुल पवार,सई माने, कांतीलाल एकतपुरे व माऊली निंबाळकर यांनी अप्रतिम रित्या केले.
या कार्यक्रमास डॉ सुनील राऊत,डॉ जावेद मुल्ला,डॉ चेतन शिंदे,शशिकांत निकम,एस.बी.आय शाखा व्यवस्थापक सोमनाथ माने व राजेंद्र जाधव,रामचंद्र चौधरी,सुनील गायकवाड,हरिभाऊ पाटील, बाळासाहेब जाधव,राहुल अंचलकर, बादशहा शेख,बाळासाहेब कोरटकर, संतोष जाधव,अजिनाथ जगदाळे हे सहकुटुंब उपस्थित होते.
"दुसऱ्याच्या सुखात-आनंदात आपला आनंद शोधूया अन् खऱ्या अर्थाने जीवन जगूया" हा संकल्प करुन सुग्रास भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेतल्यानंतर स्नेहभेटीचा सोहळा संपन्न झाला.









कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा