*करमाळा-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
करमाळा तालुक्यातील गुळसडी येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे ग्रामदैवत तसेच जागृत देवस्थान हजरत. ताजुद्दीन बाबा यांच्या उरुसाला येत्या एक जानेवारीपासून प्रारंभ होणार असल्याची गुळसडी येथील ताजुद्दीन बाबा दर्गाह ट्रस्टने माहिती दिली
-----: जाहिरात :----👇
करमाळा तालुक्यातील गुळसडी येथील ग्रामदैवत हजरत ताजुद्दिन बाबा यांचा दिनांक एक जानेवारी 2026 म्हणजेच नवीन वर्षा दिवशी संदल ची मिरवणूक गुळसडी गावा मधून निघणार असून दिनांक 2 जानेवारी शुक्रवार रोजी मुख्य संदलची मिरवणूक गावांमधून चार वाजता निघणार असून यामध्ये बाबांची चादर तसेच मानाचा घोडा याची सवाद्य मिरवणूक निघणार असून यामध्ये महाराष्ट्र राज्यातील वैजापूर येथील सुप्रसिद्ध बँड वादक हबीब चाऊस हे आपले बँडच्या माध्यमातून आपली कला सादर करणार आहे याच दिवशी आलेल्या भक्तगणांना लंगर खाना महाप्रसादाचे वाटप दर्गाह पटांगणावर होणार आहे याशिवाय ऊरूसाच्या रात्री दर्गाह पटांगणावर कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे यामध्ये कव्वाल अब्दुल हबीब अजमेरी हे कव्वाली गायक उपस्थित राहून कव्वाली पेश करणार आहे सदरच्या कव्वालीला रात्री नऊ वाजता सुरुवात होणार आहे
नववर्षानिमित्त येत्या एक जानेवारी रोजी गुळसडी येथील ग्रामदैवत हजरत संत ताजुद्दीन बाबा यांच्या ऊरूसानिमित्त होत असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन गुळसडी येथील समस्त ग्रामस्थ तसेच उर्स पंच कमिटी गुळसडी यांनी केले आहे
चौकट घेणे
गुळसडी गावात आजही हिंदू मुस्लिम एकात्मतेचे आगळेवेगळे दर्शन,,,,,,
गुळसडी तालुका करमाळा येथील मुस्लिम बांधव गावातील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतात तर हिंदू बांधव देखील ताजुद्दिन बाबा यांच्या उरूसा निमित्त भरविण्यात आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने हजेरी लावतात याचाच अर्थ गुळसडी येथे आजही हिंदू मुस्लिम एकात्मतेचे आगळे वेगळे दर्शन पहावयास मिळत आहे







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा