Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

*किडझी स्कूल अकलूज व धनशैल्य विद्यालय गिरझणी येथे राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त ‘बाल आठवडा बाजार’ उत्साहात साजरा.*

 *अकलूज प्रतिनिधी*

  *केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून दि.२३ डिसेंबर २०२५ रोजी किडझी स्कूल अकलूज व धनशैल्य विद्यालय,गिरझणी येथे विद्यार्थ्यांसाठी बाल चिमुकल्यांचा आठवडा बाजार उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शेतकरी व व्यापारी यांची भूमिका साकारत प्रत्यक्ष शेतीमाल विक्रीचा अनुभव घेतला. शेतकरी देशाचा कणा आहे व अन्नदात्याचे महत्त्व बालवयातच विद्यार्थ्यांच्या मनात रुजावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. 
            या बाजारासाठी शाळेच्या प्रशस्त व सुयोग्य परिसराची उत्कृष्ट मांडणी करण्यात आली होती. आठवडा बाजारात विविध प्रकारची कडधान्ये,धान्य,फळे,भाज्या तसेच नॉन-फायर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स विद्यार्थ्यांनी स्वतः उभारले.व्यवहार, संवाद कौशल्य,आत्मविश्वास आणि व्यवस्थापन कौशल्य दाखवत विद्यार्थ्यांनी हा बाजार अतिशय आनंददायी व संस्मरणीय पद्धतीने साजरा केला.या उपक्रमात पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांचा उत्साह द्विगुणित केला.अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये व्यवहार ज्ञान, श्रमप्रतिष्ठा व शेतकऱ्यांविषयी आदर निर्माण होतो,अशी भावना पालकांनी व्यक्त करत शाळेच्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले

जाहिरात 👇



              या उपक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संचालक विनय गायकवाड तसेच सखी सावित्री संघ,धनशैल्य विद्यालयाच्या पालक प्रतिनिधी सौ. प्रियंका केमकर यांच्या हस्ते करण्यात आले.हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अनुभवाधारित शिक्षणाचा उत्तम नमुना ठरला असून शाळेच्या शैक्षणिक व संस्कारक्षम दृष्टिकोनाचे उत्तम दर्शन घडवणारा ठरला.हा उपक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संपूर्ण नियोजनाचे काम पाहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा