Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २ डिसेंबर, २०२५

गणेशगाव पाटी ते गणेशगाव रस्त्यावरील साईड पट्ट्या गायब-- झाडे झुडपे वाढल्याने वाहन चालकांना करावी लागते तारेवरची कसरत

 उपसंपादक --नुरजहां शेख

टाइम्स 45 न्यूज मराठी



माळशिरस तालुक्यातील पूर्व भागातील गणेशगाव या छोट्याशा गावाची ओळख आज अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि प्रशासनाच्या उदासीनतेने बदलून गेली आहे.खरे तर  गावाच्या विकासाचा आराखडा रस्त्यापासून सुरू होतो.

 गावाचा मुख्य डांबरी रस्ता हळूहळू अरुंद होत आहे. आणि आज स्थिती अशी की ‘डांबरी रस्त्याला साईट पट्टीच उरली नाही.’ रस्त्याच्या दोन्हीबाजूंना वाढलेली झाडे झुडपे जीवघेणी ठरली आहेत.

गावातील नामांकित गणेशमंदिरात प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. श्रद्धा शुद्ध आहे भावना निष्ठावान आहेत पण प्रवास मात्र जीव मुठीत घेवून करावा लागतो.भाविकांची वाढती गर्दी, दोन ते चारचाकी वाहनांचे अनियंत्रित पार्किंग आणि रस्त्यालगत उभे केलेले बेकायदेशीर बांधकाम यामुळे भाविक भक्तांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे समोरून चार चाकी वाहन आले तर दुचाकीस्वार पुढे जाण्यासाठी जीव मुठीत घेवून  अक्षरशः सुईतून दोरा ओढवा तशी तारेवरची कसरत करून समोरच्या वाहनाला जागा द्यावी लागते. कारण डांबरी रस्त्याला साईट पट्टिच नाही .उकिरडे कंपाऊंड वॉलसारखी अतिक्रमणांची भिंत रस्त्यालाच चिकटल्याने वाहनांना वळण्यासाठीही जागा नाही. दुचाकी असो वा चारचाकी जरा चूक झाली, की अपघात अटळ.

हे चित्र पाहून प्रश्न पडतो—गावात रस्ता आहे की डांबरी पाऊलवाट. रस्त्यालगतची शेतीही काही ठिकाणी रस्त्यावरच सरकत आली आहे. डांबर जिथे संपते तिथे शेती नांगरली जाते जणू सार्वजनिक रस्ता ही समाजाची मालमत्ता नसून वैयक्तिक आहे .ही प्रशासनाची डोळेझाक की ग्रामस्थांची बेफिकिरी ? असा प्रश्न पडतो 

या उघड अतिक्रमणांवर आजवर प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी कारवाई न झाल्याचे लोकांचे स्पष्ट मत आहे.अतिक्रमण, कोंडी, अपघाताचा धोका… या सगळ्या समस्यांवर उपाय असताना प्रशासनाची अनास्थाच सर्वाधिक त्रासदायक ठरते आहे. नोटिसा, दावे आणि फोटोसेशनपर्यंतच कारवाई मर्यादित राहते, प्रत्यक्षात रस्ता मात्र दिवसेंदिवस गिळंकृत होत  आहे.खरे तर

रस्ते हे गावाचे श्वसनमार्ग असतात.नुकत्याच डांबरीकरण झालेल्या रस्त्याला पाईपलाईन साठी रस्ता फोडून शेतकऱ्यांनी खड्डे पाडून चांगल्या रस्त्याचीच वाट लावली आहे. रस्त्यालगतचे सर्व अतिक्रमण तात्काळ हटवणे गरजेचे आहे

उकिरडे वॉल व कंपाऊंडचे अंतर निश्चित करणे,

रस्त्याच्या रुंदीचे मोजमाप करून मूळ जागा परत मिळवणे ही पावले आता विलंब न लावता उचलावी लागतील.अन्यथा या रस्त्यावर वारंवार अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.भाविक भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा ,अतिक्रमणामुळे अपघात होवून कोणास ही प्राण गमावण्याची वेळ येवू नये.प्रशासनाने वेळीच लक्ष देवून अतिक्रमण हटविण्याची कडक मोहीम राबवून होणारे अपघात टाळावेत .



नूरजहाँ फकरूद्दिन शेख

गणेशगाव ता. माळशिरस

९१४६४४३२८२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा