Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३ डिसेंबर, २०२५

महाराष्ट्रातील मतदारांची सरकार व निवडणूक आयोगाला एक सूचना........

 संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448



दिनांक २ डिसेंबर२५  रोजी महाराष्ट्रातील नगरपंचायती व नगरपालिका काही अंशी निवडणुका झाल्या उरलेल्या निवडणूका २० डिसेंबर रोजी होणार आहेत व सर्व निवडणूक निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार  आहे  तोपर्यंत झालेल्या निवडणुकांच्या निकालासाठी उमेदवारांचे जीव टांगणीला लागणार आहेत झालेला खर्च, वेळचा अपव्यय पाहता निवडणूक आयोगाबद्दल न राहिलेली विश्वासार्हता व कामातील ढिसाळपना लक्षात घेता व ईव्हीएम मशीन बद्दलची शासकंता, मत चोरीची वाढती शंका पाहता २ डिसेंबरच्या झालेल्या सर्वच  निवडणूका रद्द करून महाराष्ट्रात पुन्हा एकदा सर्वच निवडणुका  नव्याने घेण्यात याव्यात  अशी महाराष्ट्रातील तमाम मतदारांची मागणी व अपेक्षा आहे. आयोगाने या बद्दल सर्व पक्षीयांची तातडीने बैठक घेऊन विचार करून फेर निर्णय घ्यावा तरच आयोगाची विश्वासार्हता टिकेल" एक देश एक ईलेक्शन" अशी नव्याने  मागणी करणाऱ्या सरकारला व आयोगाला हे निश्चितच अवघड काम नाही तरी याचा युद्ध पातळीवर विचार करावा व सर्व निवडणुका एकाच वेळी महाराष्ट्रात घ्याव्यात ( सर्व सामान्य मतदारांचा हा विचार वरपर्यंत संबंधितांना तातडीने पोहोचवावा ) व जन भावनेचा आदर करावा ही विनंती 


                        एक मतदार                                                 तुकाराम ग. उबाळे..{९५६१२९२०००}

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा