*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*अलिमभाई शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
अवैध मुरुम गौण खनिज उत्तखणण प्रकरणी ठेकेदारास पाचपट दंडाची कारवाई तब्बल 46 कोटीचा करमाळा तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यानी मे.एन पी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.ली.पुणे यांना केला दंडाचा आदेश ./करमाळा तालुका उप संघटक तथा,माहिती आधिकार कार्यकर्ता व मा सरपंच कोंढार चिंचोली देवीदास साळुंके यांच्या पाठपुराव्यास मोठे यश मिळाले आहे
याबाबद माहिती देताना साळुंके यानी सांगितले की,करमाळा तालुक्यातील मौजे कोर्टी ते मौजे आवटी राज्यमार्ग क्र.68 रस्त्याच्या कामात गौण खनिज मुरुम याचे अवैध उत्खनन हे कामाचे ठेकेदार मे.एन पी इन्फा प्रोजेक्ट ही कंपनी करीत असल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते तथा करमाळा तालुका उप संघटक देवीदास साळुंके यानी माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये या रस्त्याच्या संदर्भातिल माहिती सोलापुर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौण खनिज अधिकारी यांच्या कडून व तहसील कार्यालयाच्या गौण खनिज विभागा कडून तसेच सा बा खात्याच्या उप अभियंता करमाळा यांच्या कडील माहितीच्या आधारे तक्रार अर्ज मा अप्पर जिल्हाधिकारी सोलापुर यांच्या कार्यालयाकडे दी 7/2/2023 रोजी केला होता या विषया बद्दल साळुंके यानी राज्याचे महसुल मंत्री,आयुक्त महसुल पुणे विभाग पुणे याच्याकडे वेळोवेळी लेखी/तोंडी पाठपुरावा करून अवैध गौण खनिज उत्तखणना संदर्भात उठवला व तहसीलदार करमाळा यानी त्यांच्या अर्जाचा विचार करून व वरिस्ठाच्या लेखी आदेशाचे पालन करून या विषयी 6 सुनावण्या घेऊन सदर प्रकरण दी 18/6/2024 रोजी निकालावर होते असे साळुंके यांनी सांगितले
सदर प्रकरणात व तक्रारित तथ्य आढूलुन आल्याने व ठेकेदार कंपनी यांनी करमाळा तालुक्यातील 39 गावाच्या विविध गट नंबर मधून या रस्त्याच्या कामासाठी 92090.50 इतक्या ब्रास मुरुमाचे ठेकेदार मे एन पी इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनी प्रा ली पुणे यानी केले असल्याने व मा जिल्हाधिकारी सोलापुर गौण खनिज यांचे परिपत्रक दि 17/1/2023 अन्वये मुरुमाचा दर हा 900 रु प्रतिब्रास प्रमाणे 900×92090.50=82881450/-व पाचपट याप्रमाणे रु 82881450×5=414407250/-व रॉयल्टी प्रतिब्रास रु 600×92090.50=रु55254300/-असे एकुण 414407250+55254300=469661550/-रु(शेचाळीस कोटी,शहान्नव लाख,एकसठ हजार पाचशे पन्नास रुपये फक्त )दंड आकारण्यात येत आसलयाचा आदेश तहसीलदार करमाळा यांना आसनारया अधिकाराचा वापर करून व दोन्ही बाजूचे वादी/प्रति वादी याचे लेखी म्हणणे येकुन महारास्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे 48(7) अन्वये पाचपट दंडाचा आदेश दि 13/1/2026 रोजी पारित करून संबधीत ठेकेदार व तक्रारदार यांना या संबधि रितसर कळविले आहे या निकालावर समाधनी आसलयाचे साळुंके यानी सांगितले व तहसीलदार याचे आभार व्यक्त केले या निकालाने अवैध गौण खनिज उत्तखणण करनार्या ठेकेदारावर मोठा वचक बसणार असुन याकामी करमाळा तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता तथा मा सरपंच कोंढार चिंचोली यांनी तब्बल 3 वर्षे शासन दरबारी लढा देऊन शासनाचा 46 कोटीचा महसुल मिळऊन दिला याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा