*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
सध्या राज्यभरामध्ये जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे त्यातच करमाळा तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीने चांगलाच रंग धरला आहे या निवडणुकीमध्ये जो तो गट उमेदवारी अर्ज भरण्यात उत्साही आहे मात्र मुस्लिम समाजाकडे कोणीही पहात नाही मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी करमाळा तालुक्यातील तिन्ही गटातील उमेदवारांनी मुस्लिम समाजाला जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीमध्ये उमेदवारी द्यावी अशी मागणी करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांकचे माजी तालुका अध्यक्ष दाऊद अब्बास मुलाणी यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केली
सध्या करमाळा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीच्या उमेदवारांची अर्ज नाम निर्देशक पत्रे भरण्याकरिता तहसील कार्यालय मध्ये गर्दी होत आहे सध्या तालुक्यातील सर्वच गटातील उत्साही कार्यकर्ते आपल्याला जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीमध्ये प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी मोठ्या संख्येने इच्छुक आहे मात्र मुस्लिम समाजाचा एकही प्रतिनिधित्व करणारा मोठा नेता करमाळा तालुक्यामध्ये नाही याचाच अर्थ मुस्लिम समाजाला आजपर्यंत अडीअडचणी सोडवणारा नेता मिळाला नाही अशी खंत श्री मुलाणी यावेळी बोलताना व्यक्त केली आजही करमाळा तालुक्यामध्ये केम कंदर आवाटी उमरड या भागात मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे मुस्लिम समाजाच्या आजपर्यंत फक्त मतासाठीच वापर करण्यात आला आहे मुस्लिम समाजाला कोणीही वाली नाही फक्त मता पुरते वापर करणे व नंतर समाजाला वाऱ्यावर सोडणे अशी दैना अवस्था सध्या समाजाची झाली आहे
तेव्हा तालुक्यातील तिन्ही गटाच्या राजकीय नेत्यांनी मुस्लिम समाजाला डावलू नये मुस्लिम समाजाला होऊ पाहणाऱ्या येत्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी द्यावी अशी शेवटी मागणी श्री मुलाणी यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा