Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २० जानेवारी, २०२६

*शिवसेना नाव अन् चिन्हाबाबात उद्या सुनावणी; उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागल्यास शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल; ॲड. असिम सरोदेंची धक्कादायक माहिती*

 *करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360*


*मुंबई-* शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणी उद्या (21 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचा तर राष्ट्रवादी हा अजित पवारांचा पक्ष असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

राज्यात नुकत्याच नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या. तर उद्धव ठाकरेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मशाल चिन्हावर निवडणुका लढवल्या. मात्र आता पुढील सुनावणीत शिवसेना नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळाल्यास विविध प्रश्न उपस्थित राहतील. या सगळ्या प्रकरणावर अँड. असिम सरोदे यांनी एक्सवर ट्विट केलं आहे. 

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह. सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे. पण 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी Reach होणे कठीण आहे. आता लोकांचा नवीन प्रश्न- जर एकनाथ शिंदेंकडून पक्ष चिन्ह व शिवसेना नाव काढून घेतले तर मुंबई महापालिकेत काय होईल? मला वाटते शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल व एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व एकदम कमी होईल. शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल. उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील. सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरु झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयाच कधीतरी संपवेल, असं असिम सरोदे यांनी म्हटलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा