Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ७ जानेवारी, २०२६

अमिरपाशा व राबिया शेख या दांपत्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

 *अकलूज प्रतिनिधी*

 *केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण

 संस्था पुणे यांच्या वतीने आयोजित शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या स्पर्धेत माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुपेवस्ती (मेडद) येथील अमिरपाशा शेख  व जि.प.आदर्श केंद्र शाळा,माळेवाडी येथील राबिया शेख या दांपत्यांची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

        अमिरपाशा शेख यांनी कथाकथन या स्पर्धेत पुणे येथे विभागीय स्तरावर स्वलिखित 'गबऱ्या' या कथेचे प्रभावी कथाकथन करीत अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत यश संपादन केल्याने गडचिरोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. 

        तसेच त्यांच्या पत्नी राबिया अमीरपाशा शेख यांनी व्यक्ती अभ्यास या स्पर्धेत ' किशोरवयीन  मुलांना अभ्यासात येणारे अडचणी' हा मौलिक प्रबंध अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या विभागीय स्तरावर प्रभावी सादरीकरण करीत नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या.त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र शिक्षणप्रेमी कडून त्यांचे कौतुक केले जात असून माळशिरस तालुका आणि सोलापूर जिल्ह्याचा नावलौकिक राबिया व अमीरपाशा शेख या पती-पत्नीच्या यशामुळे वाढला आहे.

                 यापूर्वी या दोघांनाही माळशिरस पंचायत समितीतर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला असून,विविध संघटनामार्फत दिले जाणारे पुरस्कारही त्यांनी मिळवले आहेत. शाळा स्तरावरील विविध शैक्षणिक उठाव,विविध सांस्कृतिक उपक्रम, शिष्यवृत्ती सारखे गुणवत्तापूर्ण उपक्रम यांसारखे नाविन्यपूर्ण प्रयोग आपापल्या शाळेत राबवून तालुक्याचे नाव उंचावण्याचे कार्य श्री व सौ शेख या दाम्पत्यांनी केले आहे.शैक्षणिक क्षेत्रातील या आगळ्यावेगळ्या जोडीने नवा आदर्श संपूर्ण तालुक्यात सहज जिल्ह्याला घालून दिला आहे. माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील हे दोन्ही शिक्षक पुणे विभागाचे नागपूर व गडचिरोली येथे प्रतिनिधित्व करतील.

        त्यांच्या या यशाबद्दल व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शिक्षक,पालक,मुख्याध्यापक ज्ञानेश्वर साळुंखे व परवीन तांबोळी,यशवंतनगरचे केंद्रप्रमुख  विठ्ठलराव काळे,सदाशिवनगरचे केंद्रप्रमुख हमीद मुलाणी, विस्ताराधिकारी भरते साहेब, इनामदार साहेब,गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी यांनी शेख दांपत्यांचे कौतुक केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा