*मुख्यसंपादक -हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
सालाबाद प्रमाणे याही वर्षी इंदापूर हिंदी अध्यापक संघ, इंदापूर यांच्या वतीने दिला जाणारा 'आदर्श शिक्षक' व 'उपक्रमशील शिक्षक' पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक १० जानेवारी 2026 रोजी दुपारी १२ वाजता निमगाव केतकी तालुका इंदापूर येथील केटकेश्वर मंगल कार्यालयात पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे मा. आमदार दत्तात्रय सावंत सर, यांच्या हस्ते यावर्षी पुरस्कार वितरण सोहळा व गुणगौरव संपन्न होणार आहे या कार्यक्रमास रा.अ.स. सदस्य केंद्रीय हिंदी निदेशालय भारत सरकार - नवी दिल्लीचे सदस्य . कैलास जाधव सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास श्री. जे. एन. पाटील (अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ), श्री. सी. टी. कोकाटे (सचिव, मुख्याध्यापक संघ, इंदापूर), श्री. राजेंद्र रणमोडे (उपाध्यक्ष, पुणे जिल्हा हिंदी अध्यापक), श्री. सुधाकर भोंग (समन्वयक, पुणे जिल्हा हिंदी अध्यापक), श्री. उस्मान मुलाणी (सहसचिव, महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळ) यांच्या उपस्थितीत याही वर्षी संपन्न होणार आहे.
इंदापूर तालुका हिंदी अध्यापक संघ गेली १० वर्षे स्वखर्चाने हा कार्यक्रम आयोजित करून शिक्षकांना या माध्यमातून प्रोत्साहित करण्यात येत आहे. या कार्यक्रमात इंदापूर तालुक्यातील ५० शाळांमधील ४५० मुला-मुलींना निबंध स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांकांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करणार आहेत. १० सेवानिवृत्त गुणवत्ता पात्र शिक्षकांचा सत्कार यावेळी केला जाणार आहे.
आलेल्या सर्व ५०० मुले, १०० शिक्षक व पालक यांच्या अल्पोपहाराची सोय श्रीमती मनीषा भोसले मॅडम (सेवानिवृत्त प्राचार्य, हरणेश्वर विद्यालय, कळस) या सलग १५ वर्षे करत आल्या आहेत. याही वर्षी त्यांच्यातर्फे अल्पोपहार देण्यात येणार आहे.
अशी माहिती संघाचे अध्यक्ष श्री. के. डी. भोंग सर, उपाध्यक्ष डी. बी. निंबाळकर, कार्याध्यक्ष श्री. वाघ डी. व्ही. सर व सचिव श्री. संजीवनकुमार पांढरे सर यांनी दिली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा