Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ७ जानेवारी, २०२६

*सामाजिक प्रश्न आणि विकासाचे मुद्द्यावर लढणारे लोकप्रिय नेतृत्व मिलिंद सरतापे*

 *श्रीपूर:-बी.टी.शिवशरण*


कायम जनतेच्या विकासासाठी कार्यरत राहून विकासाचे मुद्द्यावर लढणारे लोकप्रिय नेतृत्व म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेले तरुण तडफदार नेतृत्व मिलिंद सरतापे यांनी आपल्या कर्तृत्वाने माळशिरस तालुक्यात झंझावात निर्माण केला आहे केवळ ते आंबेडकरी चळवळ रिपब्लिकन पक्ष या पुरते मर्यादित राहिले नाहीत तर माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आवश्यक व नागरीसुविधा मिळवण्यासाठी कायम आग्रही भूमिका घेऊन सामाजिक राजकीय पातळीवर आंदोलन मोर्चा धरणे आंदोलन करुन अनेक प्रश्न सोडवण्यात ते यशस्वी झाले आहेत तालुक्यातील खराब रस्ते पाणी प्रश्न विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे शैक्षणिक प्रश्न  त्यांच्या एसटी बसेस वेळेवर सोडण्याचा असो नवीन एसटी सुरू करण्याची असो  तसेच महापुरुष राष्ट्रपुरुष यांच्या अवमान असो या ज्वलंत प्रश्नांवर मिलिंद सरतापे हे आंदोलनात कायम आघाडीवर असतात त्यांनी जनतेच्या विकासासाठी सामाजिक प्रश्नांवर सदैव तत्पर व जागृत राहून कायम शासन दरबारी आवाज उठवला आहे सर्वसामान्य माणूस सामान्य कार्यकर्ता यांच्या पाठीशी राहून त्यांना विश्वास देण्याची जबाबदारी पार पाडली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक स्थानिक छोटे मोठे व्यावसायिक धंदेवाईक यांना न्याय देण्यासाठी ते पुढे असतात वास्तविक पाहता लोकप्रतिनिधी यांचे ते काम आहे परंतु संबंधित लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नावर कायम उदासीन राहिले आहेत निवडणुकीत खोटी आश्वासने भुलथापा देऊन जनतेची दिशाभूल करुन मते मागायची व निवडुन आले की जनतेकडे पाठ फिरवायची असे उद्योग अनेक लोकप्रतिनिधी यांचेकडून होत आहे मात्र लोकप्रतिनिधी नसतानाही कायम जनतेच्या प्रश्नांना सामोरे जाऊन अनेक विकासकामे करण्यासाठी सातत्याने धडपडणारे एकमेव कार्यकर्ते म्हणून मिलिंद सरतापे यांनी जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे म्हटले तर वावगे होणार नाही कैवल्य चक्रवर्ती सम्राट ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर स्थानिक व्यापारी नागरिक यांची दुकान टपरी घरे अतिक्रमण मध्ये गेली होती तेव्हा सर्व्हे होऊनही विस्थापित लोकांना आर्थिक मदत मिळण्यास विलंब व दिरंगाई होत होती तेव्हा ह्या मुद्द्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी आरपीआयचे वतीने तीव्र आंदोलन छेडले संबंधित शासकीय अधिकारी यांना धारेवर धरले त्यामुळे विस्थापित झालेल्या व्यापारी दुकानदार यांना भरपाई मिळावी याचे श्रेय आरपीआयचे आंदोलनाला जाते गोरगरीब जनतेला कायम आपला आधार वाटला पाहिजे हे नेतृत्व म्हणजे मिलिंद सरतापे आहेत व्यक्ती कार्यकर्ते नेते म्हणून त्यांनी आपला पुर्णवेळ सामाजिक कार्याला आंबेडकरी चळवळ रिपब्लिकन पक्षाला दिला आहे कायम व्यस्त व पक्ष संघटन वाढीसाठी कार्यरत असलेल्या मिलिंद सरतापे यांनी माळशिरस तालुक्यात रिपब्लिकन पक्षाचे काम नेटाने वाढवलं आहे शिस्त वेळ संघटन जबाबदारी पार पाडत असताना नित्य दरमहा पक्षाची आढावा बैठक कार्यकर्त्यांची नोंद घेतली जाते एवढे महत्वपूर्ण काम माळशिरस तालुक्यात होत आहे कदाचित महाराष्ट्रात माळशिरस तालुक्यात होत असलेलं रिपब्लिकन पक्षाचे काम कुठे होत असेल वाटत नाही माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावातील शाखेचे अध्यक्ष सरचिटणीस पदाधिकारी सामान्य कार्यकर्ता यांच्याशी मिलिंद सरतापे यांचा कायम ऋणानुबंध संबंध जिव्हाळ्याचे राहिले आहेत तालुक्यातील समाजातील सुख दुःख लग्न समारंभ आनंदाचे प्रसंग यात ते जातीने हजर असतात केवळ आरपीआयचे संदर्भात च नाही तर इतर सर्व जाती धर्मातील कार्यकर्ते नेते यांचें बरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे भावनिक व सामाजिक संबंध जुळले आहेत एवढ्या अल्प कालावधीत व मध्यम वयात त्यांनी प्रचंड लोकप्रियता माणुसकी तसेच जनतेचे प्रेम मिळवले आहे हे एकमेव दुर्मिळ उदाहरण असावे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचे ते निस्सीम चाहते कट्टर समर्थक म्हणून चळवळीची धुरा सांभाळत आहेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची विचारधारा व फुले शाहू आंबेडकर परिवर्तन भुमिका मानणारे विचार सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवत ते दररोज अठरा तास वेळ देतात त्यामुळे आपलं कुटुंब आपला प्रपंच याकडे कमी लक्ष पण गावगाडा समाजकारण चळवळ रिपब्लिकन पार्टी यात त्यांनी पुर्ण लक्ष्य केंद्रित केले आहे गावगाडा समाजकारण यामध्ये त्यांना सन्मानाने प्रस्थापित नेते त्यांना बोलावून विकास प्रक्रियेत सामावून घेतात गावातील यात्रा जत्रा उत्सव समारंभात त्यांना प्रमुख व्यक्ती म्हणून आमंत्रित केले जाते हा सन्मान त्यांच्यासाठी मोठा बहुमान आहे मिलिंद सरतापे हे नाव रिपब्लिकन पार्टी दलित चळवळ या पलीकडे गेलेले नाव आहे सर्व समाज जात धर्म पंथ गाव तालुका या जडणघडणीत निशाण्यावर ठळकपणे पुढे येताना दिसत आहे त्यामुळे त्यांना समाजात भक्कम साथ कार्यकर्ते पाठिशी राहिले आहेत असे शेकडो मिलिंद सरतापे जर प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात राज्यात निर्माण झाले तर बहुजनांची स्थानिक पातळीवर राज्यपातळीवर सत्ता यायला वेळ लागणार नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा