*अकलूज प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज : नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर रोटरी क्लब अकलूज आणि भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज (बॅच जून २०२५) वतीने जिल्हा परिषद मुलींची शाळा, वेळापूर येथील विद्यार्थिनींसाठी उत्तम दर्जाचे हँडवॉश बेसिन भेट स्वरूपात देण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष केतन बोरावके यांनी "वॉश बेसिन ची ही भेट म्हणजे केवळ एक वस्तू नसून स्वच्छता आरोग्य आणि चांगल्या सवयींचा संदेश आहे" असे मत व्यक्त करत हात धुणे ही छोटी सवय असली तरी ती आपल्याला आजारांपासून दूर ठेवते त्यामुळे शाळेत आणि घरी नेहमी हात स्वच्छ धुण्याच्या सवयीमुळे आरोग्य कसे चांगले राहते याचे महत्त्व सांगत पाण्याचा योग्य वापर तसेच शाळेची संपत्ती जपणे याविषयी मुलींना मार्गदर्शन केले व रोटरी क्लब ही सेवाभावी संस्था असून शिक्षण, आरोग्य व स्वच्छतेसाठी सातत्याने कार्य करत गरजू शाळा व विद्यार्थ्यांना शक्य होईल तेवढे सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक युन्नुस तांबोळी यांनी प्रास्ताविकातून शाळेचा व विद्यार्थिनींचा विविध क्षेत्रातील यशाचा आढावा सांगत आज नूतन वर्ष २०२६ च्या प्रारंभीच शाळेस रोटरी क्लब अकलूज व भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज यांच्या सौजन्यातून वॉश बेसिन ची भेट मिळाली हा त्यांचा उपक्रम स्तुत्य आहे असे सांगत विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी त्यांची ही उच्चतम दर्जाची भेटवस्तू महत्त्वाची ठरणार आहे असे सांगितले.
रो.अजिंक्य जाधव व गजानन जवंजाळ यांनी मनोगत व्यक्त केले.भेट समारंभानंतर उपस्थित सर्व विद्यार्थिनींना रोटरी क्लब व भक्ती कॉम्प्युटर या दोन्ही संस्थेच्या वतीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत खाऊचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष केतन बोरावके, सचिव अजिंक्य जाधव, रोटरी संचालक राजीव बनकर, प्रकल्प प्रमुख व भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूजचे प्राचार्य गजानन जवंजाळ, भक्ती संस्थेचे विद्यार्थी प्रतिनिधी सुशांत वगरे, अर्चना शिंदे-शेळके, सुचित्रा इंगळे-विभुते, प्रियांका होनमाने जि.प. वेळापूर मुली शाळेचे मुख्याध्यापक युन्नूस तांबोळी, केंद्रप्रमुख बापूसाहेब नाईक नवरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष करिष्मा मुलाणी, उपाध्यक्ष मनीषा भानवसे, तालुका शिक्षक पसंस्थेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब मगर विद्यार्थीनी व पालक वर्ग उपस्थित होते.
सूत्रसंचालन नितीन चव्हाण, आभार प्रदर्शन जीवन रननवरे, प्रवीण कुमार पांगे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीम.आसराबाई जैन, श्रीम.किरण घाडगे, सौ.कविता आवटे यांनी परिश्रम घेतले.









कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा