Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १ जानेवारी, २०२६

*गणेशगाव येथील कवयित्री नूरजहाँ शेख यांची श्रीरामपूर येथील काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड.*

 *अकलूज प्रतिनिधी*

*एहसान मुलाणी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्रीरामपूर (जि.अहिल्यानगर) येथे चौथे फातिमाबी शेख मुस्लिम साहित्य संमेलनात आयोजित कवीसंमेलनाच्या अध्यक्षपदी गणेशगाव (ता.माळशिरस) येथील कवयित्री तथा फिनिक्स इंग्लिश स्कूल संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ फकृद्दिन शेख यांना निवडीचे पत्र संस्थेचे उपाध्यक्ष खाजाभाई बागवान व सहसचिव अनिसा सिकंदर शेख यांनी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कवयित्री नूरजहाँ शेख यांची कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गणेशगाव व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे


          भारतातील पहिल्या मुस्लिम मराठी शिक्षिका,युगस्री फातिमाबी शेख यांच्या जयंतीनिमित्त श्रीरामपूर येथे ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित केलेल्या एक दिवशीय ४ थे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन रविवार दि.११ जानेवारी २०२६ आयोजित करण्यात आले.या कविसंमेलनामध्ये संपुर्ण दिग्गज कवि आपली कविता सादर करण्यासाठी सहभागी होत असतात.संपुर्ण महाराष्ट्रातून नामवंत कवी या संमेलनात उपस्थिती दर्शवितात.

            कवयित्री नूरजहाँ शेख यांचा " मन की लहरे " हिंदीतून कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे तर "माझं शिवार "मराठी काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.तसेच "आयुष्याच्या वळणावरती " हा काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे तर त्यांचा पत्रकार म्हणून माळशिरस तालुक्यात नावलौकिक आहे.अनेक वृत्तपत्रात बातमीदारीचे काम करीत असतात तसेच अनेक दिवाळी अंकातून कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.वेगवेगळ्या वृत्तपत्रातून वैचारिक लेख ही प्रसिद्ध झाले आहेत.त्यांना उत्कृष्ठ लेखन कौशल्या साठी अनेक ठिकाणी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या निवडीमुळे माळशिरस तालुक्यातील कवी व पत्रकारातून त्यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होवू लागला आहे.हे साहित्य संमेलन ऑकॅजिओन बँकवेट हॉल,एच पी गॅस शेजारी,बेलापूर रोड,श्रीरामपूर (जि.अहिल्यानगर) येथे होणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने साहित्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य  संस्थेच्या वतीने मुख्य संयोजक सलीम शेख, जिल्हाध्यक्ष दिलशाद सय्यद व सहसचिव अनिसा सिकंदर शेख यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा