*अकलूज --प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय व अकलूज पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान-२०२६ अंतर्गत हेल्मेट, सीटबेल्ट,सुरक्षित विद्यार्थी वाहतूक रस्ता सुरक्षा रॅली संपन्न झाली. पोलीस उप-अधीक्षक संतोष वाळके,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनकुमार पोंदकुले यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा रॅलीस हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.
अकलूज शहरात वाहतुकीचे नियम पाळा,अपघात टाळा येईल शाळा,वाट द्या बाळा,वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नका,आपल्या वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा इत्यादी घोषणा देत रॅलीने आपले मार्गक्रमण केले.
या रॅलीमध्ये हेल्मेट परिधान करून सर्व दुचाकीस्वार,सीट बेल्ट परिधान करून सर्व चार चाकी वाहन चालक व सुरक्षित विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस सहभागी झाल्या होत्या.या रॅलीने दुचाकीवर हेल्मेट वापरण्याचा,चार चाकीमध्ये सीट बेल्ट लावण्याचा व सुरक्षित स्कूल बस द्वारे विद्यार्थी वाहतूक करण्याचा संदेश अकलूजकरांना दिला.रॅलीमध्ये कार्यालयात कार्यरत ड्रायव्हिंग स्कूल संचालक,चालक- मालक प्रतिनिधी संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य,श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालय अकलूजच्या विद्यार्थीनी व प्राध्यापिका,अधिकृत दुचाकी विक्रेते सोनाज हिरो व नष्टे होंडा यांचे कर्मचारी,श्रीराम शिक्षण संस्था, पाणीव,शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज यांच्या स्कूल बसेस सहभागी झाल्या होत्या.
याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक सातपुते ,झाडबुके,पाटील, राऊत,मावळ,घुले,सावंत सर्व सहायक मोटर वाहन निरीक्षक, कर्मचारी व चालक तसेच अकलूज पोलीस ठाण्याचे अधिकारी विक्रम साळुंखे,करिष्मा वनवे,संजय रेगुडे व कर्मचारी यांची उपस्थिती होती.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा