*अकलूज --प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राणिशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रोफेसर डाॅ.सुधा बनसोडे होत्या तर प्रमुख पाहुणे वनस्पती शास्त्र प्रमुख डाॅ.सविता सातपुते व डाॅ.दमयंती कांबळे उपस्थित होत्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्रोफेसर डाॅ.सुधा बनसोडे यांनी विद्यार्थ्यींना मार्गदर्शक करताना सांगितले की,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्रास सहन करून स्त्रीयांना शिक्षणाची दारे उघडली होती त्यामुळे आज स्त्री उच्चपदावर काम करीत आहेत. त्याच बरोबर उच्चशिक्षण घेत आहेत.याची आपण जाणीव ठेवली पाहिजे.तसेच प्रमुख पाहुण्या डॉ. सविता सातपुते यांनी देखील सावित्रीबाई फुले यांचा आदर्श मुलींनी घेतला पाहिजे.डाॅ.दमयंती कांबळे यांनी विद्यार्थींना पुर्वीच्या स्त्री शिक्षणाची परिस्थिती व आजची स्त्री शिक्षणाची परिस्थिती स्पष्ट केली.या कार्यक्रमासाठी विज्ञान शाखेतील डाॅ.अश्विनी रेळेकर,सौ.सुनिता काटे,प्रा.अर्चना पवार,सर्व प्राध्यापिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ज्युनियर विभागाच्या सौ.पद्मजा रहाटे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.पुजा सावंत,डाॅ.अश्विनी हेगडे,बनपट्टे यांचे सहकार्य लाभले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा