*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
बाबासाहेबांची वाघीण...
प्रजासत्ताक दिनाच्या भाषणादरम्यान जळगावचा मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही म्हणून या महिला पोलीस कर्मचाऱ्याने जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या महिला कर्मचाऱ्याला तात्काळ ताब्यात घेतलं. "सस्पेंड केलं तरी चालेल, मात्र मी कुणालाही घाबरणार नाही." असं बाणेदार उत्तर या स्वाभिमानी भगिनीने दिले आहे.
आज आम्हा भारतीय लोकांना माणूस म्हणून जगण्याचे सर्व अधिकार देऊन हा देश समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या मानवी मुल्य त्रयींवर उभा करुन भारतीय लोकशाहीची प्रस्थापना करणारे 'भारतीय संविधान' अंमलात आले तो दिवस, म्हणजेच भारताचा प्रजासत्ताकदिन. हा प्रजासत्ताकदिन सर्व भारतभर अत्यंत उत्साहाने साजरा केला जात असतानाच या आनंदावर विरजण घालण्याचं काम गिरीश महाजन या मनुवादी संघोट्याने केले आहे. प्रजासत्ताकदिन म्हणजे भारतीय राज्यघटना लागू झाली तो दिवस, परंतू या प्रजासत्ताकाचा पाया घालणारी राज्यघटना ज्या 'विश्वरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले तन मन धन अर्पण करुन भारताला दिली, त्या बाबासाहेबांचाच नामनिर्देश आपल्या भाषणात टाळून त्यांचे योगदान नाकारण्याचा कपटी बामणी कावा केला जात असताना अत्यंत तडफदारपणे आपली अस्मिता जागृत ठेवून आपल्या बुलंद आवाजात या हरामखोर संघी प्रवृत्तीचा धिक्कार करणाऱ्या या पोलीस कर्मचारी भगिनीचा संताप कौतुकास्पद तसेच अभिमानास्पद आहे.
बाबासाहेबांचे उपकार जाणणाऱ्या या ताईचे मनःपूर्वक अभिनंदन आणि तिला तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी खुप खुप हार्दिक सदिच्छा.
तसेच अशा प्रकारचा अस्सल मनुवादी नीचपणा करुन आपल्या कुटील कारस्थानी प्रवृत्तीचा दाखला देणाऱ्या गिरीश महाजन यांचा तिव्र जाहीर निषेध.
भारतीय प्रजासत्ताकदिनाचे खरे मानकरी संविधाननिर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा